advertisement

उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वस्तात करा हवाई प्रवास, या सीक्रेट ट्रिकने बुक करा स्वस्त तिकीट 

Last Updated:

उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्ट्या असतात. या काळात अनेक लोक हे फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्हीही असा काही प्लॅन करत असाल तर आज आपण फ्लाइटने स्वस्तात तिकीट बुक करण्याच्या काही ट्रिक्स जाणून घेऊया.

चिप फ्लाइट बुकिंग
चिप फ्लाइट बुकिंग
नवी दिल्ली : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक शाळा-कॉलेजमध्ये परिक्षा सुरू आहेत. लवकरच परिक्षा संपून सर्वांना सुट्ट्या लागतील. या काळात अनेक लोक हे आपल्या फॅमिलीला घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. तुमचाही असा काही प्लॅन असेल तर गुड न्यूज आहे. कारण यावर्षी हवाई तिकीटांच्या किंमतीत घट झाल्याचं दिसतंय. इराण युद्धामुळे एविएशन फ्यूलच्या किंमती वाढल्या आहेत. तरीही अड्हान्समध्ये प्रवाशांना स्वस्तात फ्लाइट तिकीट बुक करण्याची संदी मिळतेय. एयरलाइन्स कंपन्या जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट आणि ऑफर्स देत आहेत. तुम्हीही योग्य वेळी तिकीट बुक केले तर तुमचेही खुप पैसे वाचू शकतील.
अडव्हान्स बुकिंगचा फायदा 
विशेषज्ञ मानतात की, फ्लाइट तिकीट स्वस्तात मिळवण्यासाठी अडव्हान्स बुसिंग सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या 1 ते 2 महिन्यापूर्वी तिकीट बुक केले तर तुम्हाला चांगली डील मिळू शकते. अगदी वेळेवर तिकीट घेतल्याने भाडं वाढू शकतं. या व्यतिरिक्त वीकडेज, विशेषतः मंगळवार आणि बुधवारी तिकीटाच्या किंमती कमी असतात. ज्यामुळे अतिरिक्त बचत केली जाऊ शकते.
advertisement
विमान तिकीटाच्या किंमती कधी कमी होतात?
सध्याच्या काळात देशांतर्गत एयरलाइन्समध्ये प्रतिस्पर्धा वाढली आहे. ज्यामुळे कंपन्या भाडे कमी ठेवून प्रवाशांना आकर्षित करत आहेत. यासोबतच प्रवाशांच्या संख्येतही चढ-उतार आणि चांगली फ्लीट मॅनेजमेंटही भाडं नियंत्रित ठेवण्यात मदत करतेय. काही रुट्सवर ऑफ-पीक सीझनमध्येही भाडे कमी पाहायला मिळतात. ज्यामुळे प्रवाशांना जास्त ऑप्शन मिळत आहेत.
advertisement
स्मार्ट ट्रिक्सने करा बचत 
स्वस्त तिकिटे बुक करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. Skyscanner सारख्या फ्लाइट सर्च प्लॅटफॉर्मवर प्राइस अलर्ट सेट केल्याने तुम्हाला भाड्यातील बदलांविषयी माहिती मिळत राहते. वेगवेगळ्या वेबसाइट्सवरील किमतींची तुलना करणे, तुमच्या ब्राउझरचा इनकॉग्निटो मोड वापरणे आणि ऑफर कोडचा फायदा घेणे यांमुळे देखील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
सुट्टयांमध्ये समजदारीने करा प्रवास 
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढत्या मागणीमध्ये तुम्ही योग्य प्लॅनिंग केली तर हवाई प्रवास करणे शक्य आहे. प्रवासाला लवचिक तारीख निवडावी आणि सकाळी किंवा रात्री उशीराच्या फ्लाइटला प्राधान्य द्यावे. थोडी समजदारी आणि योग्य वेळी बुकिंग केल्याने पैशांची बचत केली जाऊ शकते. यासोबतच प्रवासाचा अनुभवही चांगला होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वस्तात करा हवाई प्रवास, या सीक्रेट ट्रिकने बुक करा स्वस्त तिकीट 
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement