advertisement

Nanded: दुचाकीवरून जात होता, अचानक अंगात झाले स्फोट, जागेवरच जळाला तरुण, ईदगाहजवळ खळबळजनक प्रकार

Last Updated:

नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या वाजेगाव येथील पुलावर आज सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. इथं एक तरुण जागेवरच जळाला आहे.

News18
News18
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या वाजेगाव येथील पुलावर आज सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. एका दुचाकीसह तरुण भररस्त्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. विशेष म्हणजे, आग लागलेली असताना दुचाकी आणि त्या तरुणाच्या अंगातून अनेक गूढ स्फोट झाल्याने प्रत्यक्षदर्शींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

नेमकी घटना काय?

मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी हा तरुण आपल्या दुचाकीवरून वाजेगाव पुलावरून जात होता. अचानक दुचाकीने पेट घेतला. तसेच संबंधित तरुणाच्या अंगातून देखील स्फोट झाले. ही आग इतकी भीषण होती की, तरुणाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत तो तरुण ९० टक्के भाजला गेला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अद्याप या तरुणाची ओळख पटू शकलेली नाही.
advertisement

स्फोटांमुळे गूढ वाढले

या घटनेबाबतची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आग लागली असताना त्या तरुणाच्या अंगातून आणि दुचाकीतून झालेले स्फोट. हे स्फोट नेमके कशाचे होते? त्याच्याकडे काही स्फोटक पदार्थ होते का? की हा केवळ तांत्रिक बिघाड होता? अशा विविध चर्चांना आता उधाण आलं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या जवळच असलेल्या ईदगाहवर ईदची नमाज सुरू होती, त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
advertisement

पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच नांदेडमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. हा निव्वळ अपघात आहे की घातपाताचा प्रकार, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. दुचाकीला आग नेमकी कशी लागली आणि तरुणाच्या शरीरातून स्फोट होण्यामागची कारणं काय? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

विविध चर्चांना उधाण

advertisement
वाजेगाव पुलावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. हा आत्महत्येचा प्रयत्न होता की यामागे काही मोठं षडयंत्र आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. ईदच्या मुहूर्तावर ही घटना घडल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: दुचाकीवरून जात होता, अचानक अंगात झाले स्फोट, जागेवरच जळाला तरुण, ईदगाहजवळ खळबळजनक प्रकार
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement