Shreyas Iyer : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून डच्चू, दुखापतीने ग्रासलं; एका कारणामुळे श्रेयसला कमी करावं लागलं 7 किलो वजन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer loss 7 Kg weight : "दुखापतीनंतर पुनरागमन करणं नेहमीच कठीण असतं, परंतु दोन महिन्यांच्या उपचारानंतर मी पुन्हा फिट झालो," असं श्रेयसने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
IPL 2026 Panjab Kings Captain Shreyas Iyer : टीम इंडियाचा स्टार प्लेयर श्रेयस अय्यर याने मागील आयपीएल हंगामात सर्वांची मनं जिंकली. पण पंजाब किंग्जसाठी ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. तर त्यानंतर त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील जागा मिळाली नाही. सर्वकाही चांगलं सुरू असताना तो दुखापतग्रस्त झाला अन् पुन्हा त्याला स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढावी लागली.पंजाब किंग्जला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर देखील मागील 1 वर्ष श्रेयस अय्यरसाठी वैयक्तिकरीत्या आव्हानात्मक राहिलं होतं, त्याचा खुलासा त्याने माध्यमांशी बोलताना केला.
तब्बल 7 किलो कमी झालं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचदरम्यान त्याला 'स्प्लीन इंजरी' (प्लीहा दुखापत) झाली होती, ज्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. या गंभीर दुखापतीमुळे त्याचे वजन सुमारे 7 किलो कमी झालं होतं. "दुखापतीनंतर पुनरागमन करणं नेहमीच कठीण असतं, परंतु दोन महिन्यांच्या उपचारानंतर मी पुन्हा फिट झालो," असं श्रेयसने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
advertisement
स्वतःला पुन्हा सिद्ध केलं
घटलेले 7 किलो वजन पुन्हा मिळवण्यासाठी श्रेयसला खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने आव्हानांचा सामना करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं असून, आता तो पुन्हा पंजाब किंग्जला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यर याने अफलातून कामगिरी करत पंजाब किंग्जने फायनलमध्ये पोहोचवलं होतं. अशातच आता त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. गेल्या वेळी उपविजेतेपद मिळाल्यामुळे आता चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, आपले पूर्ण लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असल्याचं श्रेयसने स्पष्ट केलंय.
advertisement
खेळाडूंची बॉण्डिंग अधिक घट्ट
दरम्यान, मैदानावरील सरावाइतकंच टीम हॉटेलमधील वातावरण महत्त्वाचं असल्याचं कॅप्टन श्रेयसने नमूद केलं. "पुढचे दोन महिने आम्ही एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहणार आहोत. गेम रूममध्ये फिफा सारखे गेम्स खेळल्यामुळे खेळाडूंमधील बॉण्डिंग अधिक घट्ट होते," असंही त्याने यावेळी सांगितलं. मैदानाबाहेरील ही मैत्री मॅचमध्ये चांगले निकाल मिळवण्यासाठी मदत करतं, असा विश्वास श्रेयस अय्यरने यावेळी व्यक्त केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून डच्चू, दुखापतीने ग्रासलं; एका कारणामुळे श्रेयसला कमी करावं लागलं 7 किलो वजन!








