advertisement

IPL 2026 : किंग खानला मोठा धक्का! वशिल्यावर खेळणारा 4 कोटींचा स्टार प्लेयर संपूर्ण आयपीएलमधून 'आऊट', रहाणेसमोर संकट!

Last Updated:

Harshit Rana Ruled Out Of Entire IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला आयपीएल 2026 च्या सुरुवातीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे

Harshit Rana Ruled Out Of Entire IPL 2026
Harshit Rana Ruled Out Of Entire IPL 2026
IPL 2026, Kolkata Night Riders : श्रेयस अय्यर याने केकेआरला रामराम ठोकल्यानंतर किंग खानच्या केकेआरला कुणी वाली उरला नाही. केकेआरची घसरण सुरू झाली. याच काळात हेड कोच गौतम गंभीरने देखील टीम इंडियाची साथ दिल्याने केकेआरला नेतृत्व उरलं नाही. अजिंक्य रहाणे केकेआरसाठी धावला खरा पण त्यालाही काही खास कामगिरी मागील सिझनमध्ये करता आली नाही. अशातच केकेआरचा हुकमी एक्का देखील आता संपूर्ण आयपीएल सिझनमधून बाहेर झाला आहे.

उजव्या गुडघ्याला 'लिगामेंट इंजरी'

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला आयपीएल 2026 च्या सुरुवातीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याच्या उजव्या गुडघ्याला 'लिगामेंट इंजरी' झाली होती. या दुखापतीवर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो सध्या पुनर्वसनाच्या (rehab) प्रक्रियेतून जात आहे.
advertisement

हर्षित राणा संपूर्ण आयपीएलमधून बाहेर

केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हर्षित राणा गेल्या काही हंगामांपासून, विशेषतः चॅम्पियनशिप जिंकलेल्या मोसमात संघाचा अविभाज्य भाग होता. गेल्या 1 वर्षात त्याची कामगिरी उंचावली असून त्याचे संघात नसणे हा आमच्यासाठी मोठा लॉस असल्याचे नायर यांनी म्हटले आहे. हर्षितची जागा भरून काढणे सोपे नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
advertisement

आयपीएलसाठी ना हरकत प्रमाणपत्र  

केकेआरच्या अडचणी इथेच संपत नाहीत, कारण श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याच्या दुखापतीनेही संघाचे नियोजन कोलमडले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) स्पष्ट केले आहे की, पाथिराना अद्याप दुखापतीतून सावरत आहे. त्याला आयपीएलसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळण्यापूर्वी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे, जी अद्याप झालेली नाही.
advertisement

हर्षित राणाच्या जागी कोण?

दरम्यान, हर्षित राणाच्या जागी कोणता खेळाडू संघात येईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईडन गार्डन्सवर नवदीप सैनी, आकाश मदवाल, सिमरजीत सिंग, संदीप वॉरियर आणि केएम आसिफ हे गोलंदाज सराव करताना दिसले आहेत. यापैकी कोणा एकाची वर्णी संघात लागण्याची दाट शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : किंग खानला मोठा धक्का! वशिल्यावर खेळणारा 4 कोटींचा स्टार प्लेयर संपूर्ण आयपीएलमधून 'आऊट', रहाणेसमोर संकट!
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement