Mumbai : मुंबईकर खोळंबा होणार, महत्त्वाच्या मार्गावर 3 महिने नो एन्ट्री, पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Mumbai Traffic Rule Changes : मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून महत्त्वाच्या मार्गावर पुढील तीन महिन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी येत्या तीन महिन्यांसाठी शहरातील प्रवास अतिशय त्रासदायक ठरणार आहे. तीन महिन्यांसाठी वाहतूक बदल करण्यात आला आहे. नक्की कोणत्या मार्गावर हा बदल असणार आहे शिवाय कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा याबाबत सविस्तर अपडेट जाणून घ्या.
वाहतूक नियमावलीत मोठे फेरबदल
मुंबईतील कोस्टल मार्ग वाहतूकीसाठी खुला झाल्यापासून आणि एल्फिन्स्टन पुल वाहतुकीस बंद झाल्याने गणपतराव कदम मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी वाढली होती. तसेच गणपतराव कदम मार्गावर श्रीराम नाका येथे दैनिक शिवनेर मार्ग तसेच एस.एस.अमृतराव मार्ग हे दोन्ही रस्ते येऊन मिळतात. त्यात या ठिकाणी वाहनांना वळण घेण्यासाठी जागा कमी असल्याने एखाद्या वाहनाने एका रस्त्यावरुन दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी उजवे वळण घेतले तर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.
advertisement
किती तारखेपर्यंत असणार बदल
होण्याऱ्या या कोंडीसाठी श्रीराम मिल नाका येथे चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना उजवे वळण घेण्यास बंदी करण्यात आली. हे वाहतूक बदल 11 जून 2026 पर्यंत लागू असणार आहे.
वाहतूक बदलांचं संपूर्ण वेळापत्रक
1)एस.एस.अमृतवार मार्गावरुन गणपतराव कदम मार्गावर आल्यावर वाहनांना डावे वळण घेऊन यादव चौकाकडे जाता येईल. मात्र उजवे वळण घेऊन वरळी नाक्याकडे किंवा सरळ दिशेने दैनिक शिवनेर मार्गावर पोहतचा येणार नाही.
advertisement
2)दैनिक शिवनेर मार्गावरुन तुम्ही गणपतराव कदम मार्गावर आल्यानंतर तिथं डावे वळण घेऊन वरळी नाक्याकडे पोहचता येईल. मात्र उजवे वळण घेतल्यानंतर यादव चौकाकडे किंवा थेट एस.एस.अमृतावर मार्गाकडे जाता येणार नाही.
3)वरळी नाक्याकडून येताना श्रीराम मिल नाक्यावर पोहोचल्यानंतर डावीकडे वळून एस. एस. अमृतवार मार्गावर जाता येईल किंवा तुम्हाला सरळ यादव चौकाकडे जाता येणार आहे. मात्र उजवे वळण घेऊन दैनिक शिवनेर कडे जाता येणार नाही.
advertisement
4)यादव चौकाकडून येताना श्रीराम मिल नाक्यावर डावीकडे वळून दैनिक शिवनेर मार्गावर जाता येईल किंवा सरळ वरळी नाक्याकडे जाऊ शकता. मात्र उजवीकडे वळून एस. एस. अमृतवार मार्गावर जाता येणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 9:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईकर खोळंबा होणार, महत्त्वाच्या मार्गावर 3 महिने नो एन्ट्री, पर्यायी मार्ग कोणते?








