advertisement

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची डेडलाईन ठरली, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके, कधी धावणार?

Last Updated:

प्रशासनाकडून या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके मे 2026 पर्यंत चालू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Pune Metro: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची डेडलाईन ठरली, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके, कधी धावणार?
Pune Metro: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची डेडलाईन ठरली, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके, कधी धावणार?
पुणे: पुणेकरांची, विशेषतः हिंजवडी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन 3 चे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाने या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके मे 2026 पर्यंत चालू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
आयुक्तांनी केली 23 स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकताच माण ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंड पाहणी केली. औंध येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी संपूर्ण 23.2 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवरील 23 स्थानकांची तपासणी केली. यावेळी मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि पीआयटीसीएमआरएलचे कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी सुद्धा उपस्थित होते.
advertisement
कामाचा वेग वाढवताना गुणवत्ता आणि सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी स्पष्ट सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे 94.20 टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. तसेच, आरडीएसओ आणि सीएमआरएसच्या तपासण्या देखील पूर्ण झाल्या आहेत.
advertisement
काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प देशातील पहिली मेट्रो आहे, जी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवली जात आहे. 23.2 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गिकेतून जाणारा हा प्रकल्प टीआरआयएल (टाटा समूह) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स या भागीदारांच्या सहकार्याने राबवला जात आहे. एकूण खर्च सुमारे 8,313 कोटी रुपये असून, हा प्रकल्प पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे.
advertisement
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की मे 2026 पर्यंत 12 स्थानकांचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची डेडलाईन ठरली, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके, कधी धावणार?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement