पुणेकरांनो, आता फिरायलाच नाही तर जेवायलाही चला मेट्रोमध्ये; 'मेट्रो कोच रेस्टॉरंट' सज्ज; कुठं आणि कसं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महामेट्रोने तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी हा अभिनव प्रयोग केला आहे. टिटागड कंपनीने दिलेल्या जुन्या मॉडेल कोचचे रूपांतर एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे
पुणे: पुणेकरांच्या प्रवासाला आता खमंग चवीची फोडणी मिळणार आहे. पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी एक खास भेट आणली असून, आता चक्क मेट्रोच्या डब्यात बसून वातानुकूलित (AC) वातावरणात जेवणाचा आनंद घेता येणार आहे. महामेट्रोने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाच्या परिसरात 'मेट्रो कोच रेस्टॉरंट' उभारले असून, त्याचे काम आता पूर्ण झाले आहे.
काय आहे हे 'मेट्रो कोच रेस्टॉरंट'?
महामेट्रोने तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी हा अभिनव प्रयोग केला आहे. टिटागड कंपनीने दिलेल्या जुन्या मॉडेल कोचचे रूपांतर एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट जिल्हा न्यायालय स्थानकाजवळील कौटुंबिक न्यायालयाच्या (Family Court) परिसरात उभारण्यात आले असून, लवकरच ते पुणेकरांसाठी खुले होईल.
advertisement
वनाझ-रामवाडी आणि पिंपरी चिंचवड-स्वारगेट या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे रेस्टॉरंट उत्तम पर्याय ठरेल. या उपक्रमातून महामेट्रोला दरमहा सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर हे रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होईल, जिथे प्रवाशांना वाजवी दरात दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.
advertisement
अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, "जुन्या कोचचा पुनर्वापर करून हे आकर्षक रेस्टॉरंट साकारले आहे. प्रवाशांना कमी दरात चांगल्या सुविधा देणे आणि तिकिटाव्यतिरिक्त महसूल वाढवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 7:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, आता फिरायलाच नाही तर जेवायलाही चला मेट्रोमध्ये; 'मेट्रो कोच रेस्टॉरंट' सज्ज; कुठं आणि कसं?









