advertisement

34 कोर्ट केसेस अन् जीवे मारण्याच्या धमक्या! 44 वर्षांपूर्वीच्या फिल्मने देशात आणलेला भूकंप, तरीही कमावलं 225% प्रॉफिट

Last Updated:
४४ वर्षांपूर्वी असा एक सिनेमा आला होता, ज्याने अख्ख्या देशात भूकंप आणला होता. या फिल्मच्या विरोधात १-२ नाही, तर तब्बल ३४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. अनेक शहरांत चित्रपटगृहांबाहेर निदर्शनं झाली, पोस्टर्स फाडण्यात आले होते.
1/12
बॉलिवूडमध्ये एखाद्या सिनेमामुळे वाद होणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. नुकतंच नोरा फतेहीच्या अश्लील गाण्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर या गाण्यावर कारवाई करण्यात आली असून सर्व भाषांमधील या गाण्याचे व्हिडिओ यूट्यूबवरून काढण्यात आले आहेत.

2/12
दरम्यान, ४४ वर्षांपूर्वी असा एक सिनेमा आला होता, ज्याने अख्ख्या देशात भूकंप आणला होता. त्या काळी ना इंटरनेट होतं, ना सोशल मीडिया, तेव्हाही या सिनेमामुळे देशात इतकी खळबळ माजली होती, की या फिल्मवर थेट 34 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

3/12
'महाभारत'सारखी अजरामर मालिका देणारे दिग्गज निर्माते बी.आर. चोप्रा यांनी १९८२ मध्ये समाजव्यवस्थेला आरसा दाखवणारा एक धाडसी प्रयोग केला होता, ज्याचं नाव होतं 'निकाह'.

4/12
बी. आर. चोप्रा यांनी जेव्हा या सिनेमाची सुरुवात केली होती, तेव्हा त्याचं नाव तलाक असं ठेवण्यात आलं होतं. मात्र, विषयाचं गांभीर्य आणि त्यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन नंतर ते 'निकाह' असं करण्यात आलं.

5/12
काही महिन्यांपूर्वीच यामी गौतमचा हक हा सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये तीन तलाक आणि त्याचा मुस्लिम महिलावर्गावर कसा परिणाम होतो, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. मात्र, तब्बल ४४ वर्षांपूर्वी बी. आर. चोप्रा यांनी या ज्वलंत विषयाला हात घातला होता.

6/12
त्या काळी तीन तलाकसारख्या ज्वलंत आणि धार्मिक मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला मुस्लिम समाजातील एका वर्गाचा तीव्र विरोध होता. लोकांच्या मते, हा सिनेमा धार्मिक भावना दुखावणारा होता.

7/12
याचाच परिणाम असा की या फिल्मच्या विरोधात १-२ नाही, तर तब्बल ३४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. अनेक शहरांत चित्रपटगृहांबाहेर निदर्शनं झाली, पोस्टर्स फाडण्यात आले होते.

8/12
या सिनेमातून सलमा आगा या नव्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तिचा अभिनय आणि तिचा आवाज प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेला. पण पडद्यावर साकारलेल्या पात्रामुळे तिला खऱ्या आयुष्यात नरकयातना सोसाव्या लागतील असा विचारही तिने केला नसेल.

9/12
सलमा आगाला रोज धमकीची पत्रं यायची, तिला भारत सोडून लंडनला परत जाण्यास बजावण्यात आलं होतं. राज बब्बर आणि दीपक पराशर यांनाही प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. मात्र, याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, विरोधाचा धूर जसा जसा वाढत गेला, तशी लोकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकताही ताणली गेली.

10/12
अखेर जेव्हा 'निकाह' प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर जणू पैशांचा पाऊस पडला. केवळ ४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या फिल्मने ९ कोटींहून अधिक कमाई केली होती. तब्बल २२५% नफा कमावून हा सिनेमा त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता.

11/12
लोकांनी या सिनेमातील कथेला आणि त्याच्या आशयाला डोक्यावर घेतलं. समाजातील एका अनिष्ट प्रथेवर केलेलं भाष्य प्रेक्षकांना आवडलं आणि प्रेक्षकांच्या प्रेमापुढे विरोधकांच्या कुरघोडी फिक्या पडल्या. सलमा आगा या एका रात्रीत सुपरस्टार झाल्या खरं, पण 'निकाह'सारखं यश त्यांना पुन्हा कधीच मिळालं नाही.

12/12
आजही हा सिनेमा काळाच्या पुढचा मानला जातो. जर तुम्हाला हा ऐतिहासिक वाद आणि त्यातील सुंदर गाणी अनुभवायची असतील, तर हा सिनेमा यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. याशिवाय जिओ हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राइमवरही तुम्ही तो पाहू शकता.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement