Raj Thackeray: इंस्टाग्राममधून आधी बाहेर पडा.., राज ठाकरेंनी महाराष्ट्राला केलं आवाहन, कारणही सांगितलं!
- Published by:Sachin S
Last Updated:
मध्यंतरी मी पुरस्कार वैगेरे दिले. पण त्यावेळी माझ्या मोबाईलमध्ये ते नव्हतं. डान्सबार बंद झाले त्याची ही लक्षण आहे,
मुंबई: "सरकार आता प्रश्नच विचारू नये, आयपीएलमध्ये, सिनेमे, टीव्ही, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल हा एक अवयव झाला आहे. आधी लोक रस्त्यावर यायचे. आता राग व्यक्त कराायचा तो मोबाईलवर. हे गुंतवून टाकायचं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचं नाही. त्यामुळे इंस्टाग्राममधून बाहेर पडा' असं आवाहनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा विराट अशा गर्दीमध्ये शिवतीर्थावर पार पडला. यावेळी राज ठाकरेंची तोफ चौफेर धडाडली. पण यावेळी राज ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर फैलावर घेतलं.
"आज सरकारने देशाला करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे, आयपीएल सुरू आहे, सिनेमे येतात. महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगायचं, पण एक सांगतो, इंस्टाग्राममधून बाहेर या. इंस्टाग्राममधून बाहेर पडला तर संडासमधून बाहेर पडाल. मध्यंतरी मी पुरस्कार वैगेरे दिले. पण त्यावेळी माझ्या मोबाईलमध्ये ते नव्हतं. डान्सबार बंद झाले त्याची ही लक्षण आहे, ते बंद झालं आता इथं हे सुरू झालं आहे. तुम्हाला गुंतवून ठेवायचं आहे. सरकारला प्रश्न विचारायचे नाही. इतके अडकून जायचं हे, याच्यासाठी हे डिझाईन आहे, त्यामुळे इंस्टाग्राममधून बाहेर पडा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं
advertisement
तसंच, 'सरकार आता प्रश्नच विचारू नये, आयपीएलमध्ये, सिनेमे, टीव्ही, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल हा एक अवयव झाला आहे. आधी लोक रस्त्यावर यायचे. आता राग व्यक्त कराायचा तो मोबाईलवर. हे गुंतवून टाकायचं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचं नाही. माध्यमांवर सारखा दबाव आहे, आज महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा २ लाख कोटी कर्ज होतं, आता हे कर्ज ११ लाख कोटींवर गेलं आहे.
advertisement
'राज्यात ड्रग्स तस्करांचा सुळसुळाट'
संपूर्ण महाराष्ट्रभरात ड्रग्स विकले जात आहे. शाळा कॉलेजमध्ये ड्रग्स विकले जात आहे. महाराष्ट्राचं काय करणार आहोत, ग्रामीण भागात मुलांची प्रगती होत नाही. लहान-लहान मुलं पळवली जात आहे. मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहे. एनसीआरबीच्या आकड्यानुसार, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आकडे सांगितलं होते, दरवर्षी ४५०० ते ५५०० मुलं बेपत्तात होतात. काय वाटत असेल, त्यांच्या आई वडिलांना? असा संतप्त सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
advertisement
महाराष्ट्र next वेबसाईटची घोषणा
गेल्या अनेक वर्षात खूप काही बदलले आहे. यासाठी एक.प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाहिजे कसा घडले पाहिजे पण हे मांडायच कोणाला..मांडल्यानंतर आम्हाला उत्तर कधी मिळणार. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक.नवीन वेबसाइट महाराष्ट्राला अर्पण करत आहे. ज्यावर तुमचे विचार पाहिले जातील. तुम्हा आम्हाला महाराष्ट्र उभा करायचा आहे वाचवायचे आहे याचे पहिले पाऊल. महाराष्ट्र next.. महाराष्ट्र पुढचा या नवीन योजनेचे शुभारंभ राज ठाकरेंनी केलं. यामध्ये 27 विषय आहे आणि त्यामध्ये काही नवीन निर्माण करायचे असेल तर ते विषय तुम्ही मांडू शकता..आपण फक्त सरकार मधले वाहक असणार.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray: इंस्टाग्राममधून आधी बाहेर पडा.., राज ठाकरेंनी महाराष्ट्राला केलं आवाहन, कारणही सांगितलं!










