Migraine : बदलत्या हवामानामुळे वाढतो मायग्रेनचा त्रास, काळजी घेण्यासाठी मेंदूविकार तज्ज्ञांनी दिल्यात महत्त्वाच्या सूचना
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मायग्रेनच्या रुग्णांसाठी बदलणारं हवामान त्रासदायक ठरू शकतं. कारण काही वेळ सकाळी आल्हाददायक हवा असते पण नंतर खूप उकडायला सुरुवात होते, काही वेळानं परत थंड वाटतं. तापमानातील या चढ-उतारांमुळे शरीराचं अंतर्गत संतुलन बिघडतं, ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते.
मुंबई : मार्च महिन्यात ऊन तापायला लागलेलं असताना, काही भागात पाऊस पडतोय. काही भागात रस्ता दिसत नाही इतकी गारपीट झाली. या ऋतू बदलांचे परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतोय.
मायग्रेनच्या रुग्णांसाठी बदलणारं हवामान त्रासदायक ठरू शकतं. कारण काही वेळ सकाळी आल्हाददायक हवा असते पण नंतर खूप उकडायला सुरुवात होते, काही वेळानं परत थंड वाटतं. तापमानातील या चढ-उतारांमुळे शरीराचं अंतर्गत संतुलन बिघडतं, ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते.
आपल्या शरीराची संवेदनशीलतेमुळे होतं असं मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. आनंद कुमार सक्सेना यांनी म्हटलंय. सकाळच्या थंडीमुळे शरीरातील नसा आकुंचन पावतात आणि दुपारच्या उष्णतेमुळे त्या अचानक प्रसरण पावतात.
advertisement
चेतासंस्थेतील आवेगांमधील हा वेगानं होणारा बदलच मायग्रेनच्या वेदनांना कारणीभूत ठरतो. याव्यतिरिक्त, वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं, मायग्रेन होण्याचं हे एक सर्वज्ञात कारण आहे. आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे व्यक्तीला थकवा येऊ शकतो, ज्यामुळे चिडचिड वाढते आणि झोप नीट लागत नाही.
advertisement
प्रतिबंधासाठी सोपे उपाय : मायग्रेनचा प्रभाव कमी करण्यासाठी डॉक्टरांनी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय सांगितलेत.
भरपूर पाणी प्या: तहान लागेपर्यंत थांबू नका; दिवसभर वारंवार पाणी पीत राहा. लिंबू पाणी किंवा नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण भरपूर असतं.
सूर्यप्रकाश टाळा: दुपारच्या तीव्र उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरा.
दिनक्रम : जेवणाच्या वेळा चुकवू नका. रिकाम्या पोटी किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तर डोकेदुखी वाढू शकते.
advertisement
डायरी : हवामान बदलल्यावर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल, तर वेदना केव्हा आणि का सुरू झाली याची नोंद डायरीत करा. यामुळे डोकेदुखीची कारणं ओळखायला मदत होईल.
मायग्रेनची वेदना वारंवार होत असेल किंवा असह्य असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवनशैलीत छोटे बदल केल्यानं ही समस्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Migraine : बदलत्या हवामानामुळे वाढतो मायग्रेनचा त्रास, काळजी घेण्यासाठी मेंदूविकार तज्ज्ञांनी दिल्यात महत्त्वाच्या सूचना