'महाराष्ट्रावर तब्बल 11 लाख कोटींचं कर्ज', पृथ्वीराज चव्हाणांची आठवण काढत राज ठाकरेंनी फडणवीसांवर साधला निशाणा
- Published by:Sachin S
Last Updated:
कोस्टल रोड हा त्यांच्या एंट्रीसाठी आहे, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तयार केला आहे. पण मराठी माणूस इथं कौतुक करतोय.
मुंबई: "आज महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा २ लाख कोटी कर्ज होतं, आता हे कर्ज ११ लाख कोटींवर गेलं आहे" असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी केली.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा विराट अशा गर्दीमध्ये शिवतीर्थावर पार पडला. यावेळी राज ठाकरेंची तोफ चौफेर धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
"मुख्यमंत्री बोलत आहे विकास करत आहे, विकास करत आहे, महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनमी बनवायचे आहे असे बोलत आहे पण महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात फक्त २ लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रावर होते. तीन वेळा या कर्जमाफी झाली पण सर्वात जास्त आत्महत्या आकडा महाराष्ट्रात आहे' असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
advertisement
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
"९ मार्च २००७ ला इथं आपली पहिली जाहीर सभा झााली होती, आज पक्षाला २० वर्ष झाली, आज आनंदाची भाग्याची गोष्ट म्हणजे, १९ मार्चला गुढीपाडवा यावा याला मी शुभ संकेत मानतो, निवडणूक आल्या गेल्या, पण आपण इथं महाराष्ट्रासाठी इथं उभे आहोत. महाराष्ट्राला गत वैभव मिळवून देण्यासाठी सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच, हा माझ्या तुम्हाला शब्द आहे.
advertisement
३ वर्ष आता राज्यात निवडणुका नाही, त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला लोक मोकळे आहे, आज गॅस मिळत नाही, इराणला आपण साथ द्याायला पाहिजे होती. देशामध्ये येणारं तेल हे इराणकडून येतं. ते आपल्याला रुपयांने देतात, ते आले, आता पुढंच माहित नाही. खामोनेई गेले त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काही स्टेटमेंट दिलं नाही. कुठे निषेधााचा स्टेटमेंट दिलं नाही. जो देश जम्मू -काश्मीरच्या प्रश्नावर भारताला पाठिंबा देत होता, त्या देशाच्या अडचणीत आपण उभे राहिलो नाही, त्याचा भविष्यात नक्की त्रास होईल,
advertisement
हे जे मी तुम्हाला सांगतो, विसरत जाऊ नका, बाळासाहेबाचं भाषण ऐकलं होतं, एक एक गोष्ट माझ्या डोक्यात फिट झााली, सभेत आलेल्या कार्यकर्त्यांना काय दिलं हे महत्त्वाचं आहे
आज सरकारने देशाला करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे, आयपीएल सुरू आहे, सिनेमे येतात. महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगायचं, पण एक सांगतो, इंन्साटाग्राममधून बाहेर या. इंन्साटाग्राममधून बाहेर पडला तर संडासमधून बाहेर पडाल. मध्यंतरी मी पुरस्कार वैगेरे दिले. पण त्यावेळी माझ्या मोबाईलमध्ये ते नव्हतं. डान्सबार बंद झाले त्याची ही लक्षण आहे, ते बंद झालं आता इथं हे सुरू झालं आहे. तुम्हाला गुंतवून ठेवायचं आहे. सरकारला प्रश्न विचारायचे नाही. इतके अडकून जायचं हे, याच्यासाठी हे डिझाईन आहे,
advertisement
सरकार आता प्रश्नच विचारू नये, आयपीएलमध्ये, सिनेमे, टीव्ही, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल हा एक अवयव झाला आहे. आधी लोक रस्त्यावर यायचे. आता राग व्यक्त कराायचा तो मोबाईलवर. हे गुंतवून टाकायचं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचं नाही.
माध्यमांवर सारखा दबाव आहे, आज महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा २ लाख कोटी कर्ज होतं, आता हे कर्ज ११ लाख कोटींवर गेलं आहे. पिझ्झा मागितला तर १० मिनिटांत येतो. पण तुम्हाला १० मिनिटांमध्ये जायचं असेल तर जाता येत नाही. ब्रिटिशांच्या काळात हे मैदान बंद झाालं, त्यानंतर कुठे मैदानं उभी राहिली, मुलांसाठी काय करतोय
advertisement
लहान मुलांसाठी बागा तरी तयार करतोय का, ज्या केल्या असेल तिथे जाऊ तरी वाटतं का? शहर कोलमडलं. मध्यतंरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, वाहतूक कोंडी प्रचंड झाली आहे. उद्या इतकी वाहतूक कोंडी होईल की, घरातून बाहेर पडताा येणार नाही.
कोस्टल रोड हा त्यांच्या एंट्रीसाठी आहे, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तयार केला आहे. पण मराठी माणूस इथं कौतुक करतोय.
advertisement
मी काही व्हिडीओ पाहतोय, त्यामध्ये अजूनही काही लोक हिंदी बोलताय, त्यामुळे आपलीच माणसं हिंदीत बोलत आहे. दक्षिणेत जाऊन बघा, अस्मिता काय असते, ते पाहा.
संपूर्ण महाराष्ट्रभरात ड्रग्स विकले जात आहे. शाळा कॉलेजमध्ये ड्रग्स विकले जात आहे. महाराष्ट्राचं काय करणार आहोत, ग्रामीण भागात मुलांची प्रगती होत नाही. लहान-लहान मुलं पळवली जात आहे. मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहे. एनसीआरबीच्या आकड्यानुसार, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आकडे सांगितलं होते, दरवर्षी ४५०० ते ५५०० मुलं बेपत्तात होतात. काय वाटत असेल, त्यांच्या आई वडिलांना.
काही माणसं आहे, महाराष्ट्राची परंपरा दाखवतो,
कोणती शहर कोणती राज्य म्हणायचे याला भाषेची हमी नाही कोणाचीही हमी नाही आणि याला म्हणता शिवरायांच्या राज्यात राहतो..हवे होते आज विधानसभेत जाऊन काढले असते त्यांना
आम्ही इंस्टाग्राम मध्ये गुंतलो आहे आम्हाला कसली पडली नाही
हा महारष्ट्र देशाला दिशा दाखवत आला त्या महाराष्ट्र कडे काढू जवळून पाहिला का
काही माणसांची नावे जी आपण विसरले आहेत..महाराष्ट्राची ताकद विसरलो आहोत
संत परंपरा, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जिजाऊ..देशातील पहिले बंडखोर स्त्री ज्या आईने स्वतःच्या वडीलांना विचारे की स्वतःसाठी का नाही करत आणि त्यानंतर एक स्वराज्य जन्माला दिला छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज, बालाजी विश्वनाथ पेशवे,
ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला वाढवला त्यांना विसरू नका त्यांनी काय योगदान केले हे महत्त्वाचे आहे. पहिले बाजीराव पेशवे, अहिल्यादेवी होळकर, शिंदे होळकर, गायकवाड, तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई, जगन्नाथ शंकर शेठ, भाऊ अजिंक्य, सीताराम खंडेराव वैद्य, अशी अनेक माणसं होऊन गेली आहे.
अनेक नेते येऊन गेले पण एक माणूस असा होता जो कधीच पुन्हा नाही झाला तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा एकमेव माणूस आहे. अनेक मतभेद असतील. पण जे योग्य आहे ते योग्यच असले पाहिजे. जी फळं कधी पाहिली नाही ती आज महाराष्ट्रामध्ये मिळत आहे, याच्या मागे शरद पवारांचे योगदान आहे. फळ उत्पादनाची मुहूर्तमेढ ही शरद पवारांनी रोवली आहे
काँग्रेस पक्षाची स्थापना महाराष्ट्र मध्ये झाली. Rss ची सहापैकी 4 संचालक मराठी होते. या सगळ्या गोष्टींची मूळ महाराष्ट मध्येच आहे. महाराष्ट्र प्रतिमेमध्ये अडकला आहे, प्रतिमेचे पूजन करत आहोत. एवढा भरभरून महाराष्ट्राला दिले आहे याची काय किंमत देश पहायचा की महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे त्यांना महाराष्ट्र काय देतो. भारतीय संघात 8/9 मराठी खेळाडू असायचे पण आता कुठे अडलोय आम्ही करमणुकीमध्ये गुंतलोय.
नवीन योजना तुमच्यासमोर आणत आहे. 2006 ला याच व्यासपीठावरून बोलो की महाराष्ट्राचा आराखडा आणले.. मग एका पत्रकाराने विचारे कधी येणार ब्ल्यू प्रिंट ते आणली असती तर किमान ते तरी पहिली असती लोकांनी. सगळीकडे लोक मला.विचारायचे की ते ब्ल्यू प्रिंटचं काय झालं, प्रत्येक परिषदेमध्ये हा प्रश्न असायचा..जेव्हा आणला तेव्हा कोणी विचारले नाही काय आहे त्यात लोकांना वाचण्यात रस नाही खोदण्यात रस आहे.
महाराष्ट्र next वेबसाईटची घोषणा
गेल्या अनेक वर्षात खूप काही बदलले आहे. यासाठी एक.प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाहिजे कसा घडले पाहिजे पण हे मांडायच कोणाला..मांडल्यानंतर आम्हाला उत्तर कधी मिळणार. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक.नवीन वेबसाइट महाराष्ट्राला अर्पण करत आहे. ज्यावर तुमचे विचार पाहिले जातील. तुम्हा आम्हाला महाराष्ट्र उभा करायचा आहे वाचवायचे आहे याचे पहिले पाऊल. महाराष्ट्र next.. महाराष्ट्र पुढचा या नवीन योजनेचे शुभारंभ राज ठाकरेंनी केलं. यामध्ये 27 विषय आहे आणि त्यामध्ये काही नवीन निर्माण करायचे असेल तर ते विषय तुम्ही मांडू शकता..आपण फक्त सरकार मधले वाहक असणार.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:03 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'महाराष्ट्रावर तब्बल 11 लाख कोटींचं कर्ज', पृथ्वीराज चव्हाणांची आठवण काढत राज ठाकरेंनी फडणवीसांवर साधला निशाणा










