advertisement

Weather Alert: महाराष्ट्रावर 24 तास संकटाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान कसं असेल पाहुयात.
1/7
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान कसं असेल पाहुयात.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 32-26 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील. तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोलापूरमध्ये वादळ, विजा आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तापमान वाढ पहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 33-35 अंश तापमान राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात उष्ण हवामान असेल. परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

6/7
विदर्भातील नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, वाशीम आणि भंडारामध्ये उष्ण तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील. वर्धा आणि गडचिरोलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर यवतमाळ आणि चंद्रपूरला अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

7/7
दरम्यान, 20 मार्चला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्ण हवामान पहायला मिळेल. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement