advertisement

फक्त एका शेती नको, जोडधंदाही करा; शेतकऱ्याने गायी घेतल्या आता महिन्याला लाखांची कमाई

Last Updated:
केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी नोकरीच्या मागे न धावता दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आहे. या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत.
1/5
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. सोलापूर जिल्ह्यातील पेणूरच्या बाळासाहेब महादेव रणदिवे यांनी असाच व्यवसाय केला आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आहे. या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत.

2/5
बाळासाहेब रणदिवे यांनी 15 वर्षांपूर्वी केवळ दोन गायींपासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज त्यांच्या गोठ्यात तब्बल 40 गाई आहेत.

3/5
त्यांच्या गायींपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून 200 लिटर दुधाचे उत्पादन होते. तीन महिन्यांनी पशुवैद्यकांना गोठ्यावर बोलावून गायींची तपासणी केली जाते. तसेच आवश्यक लसीकरणही केले जाते. गायींना दिवसातून दोन वेळा चारा आणि योग्य खुराक दिला जातो. गोठ्याची नियमित स्वच्छता आणि जनावरांची विशेष काळजी घेतली जाते.

4/5
त्यांना या व्यवसायासाठी दरमहा चारा आणि खुराकावर एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र दूध विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च वजा करून त्यांना महिन्याला सुमारे एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे बाळासाहेब सांगतात.

5/5
देशात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असे आवाहन रणदिवे करतात. शेती असेल तर शेती करावी, अन्यथा छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश ते तरुणांना देत आहेत.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement