advertisement

Team India: 2027पर्यंत मी सांगेन ती टीम निवडा, गौतम गंभीर नाही तर कोणी दिली बोर्डाला थेट ऑफर; चाहत्यांमध्ये कुजबुज सुरू

Last Updated:

अजित आगरकर यांनी 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यश मिळवले असले तरी काही मोठे पराभवही पाहायला मिळाले आहेत.

News18
News18
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. टीम इंडियाचे गेल्या काही वर्षातील हे आयसीसीचे तिसरे विजेतेपद आहे. आता भारतीय संघाचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेत होणआऱ्या २०२७ मधील वनडे वर्ल्डकपवर असेल. सध्या टीम इंडियाचे खेळाडू आणि बीसीसीआय आयपीएलच्या तयारीत गुंतलेले असताना एक मोठी बातमी समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सध्याचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपला कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाढवण्याची विनंती बीसीसीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे. 2023 पासून या पदावर कार्यरत असलेल्या आगरकर यांचा कार्यकाळ IPL 2025 पूर्वीच एका वर्षाने वाढवण्यात आला होता.
एका वृत्तानुसार आगरकर यांच्या या विनंतीवर बीसीसीआयने चर्चा केली असून अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. सध्या निवड समितीत अजित आगरकर यांच्यासोबत प्रज्ञान ओझा, आरपी सिंग, अजय रात्रा आणि शिवसुंदर दास यांचा समावेश आहे.
advertisement
आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. भारताने तीन आयसीसी किताब जिंकले असून त्यात सलग दोन टी20 वर्ल्ड कप आणि एक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. याशिवाय 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत उपविजेता ठरला होता.
मात्र याच काळात टीम इंडियाचा दारूण पराभव देखील झाल्याचे पाहायला मिळाले. भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ऐतिहासिक कसोटी मालिका पराभव पत्करावे लागला होता. तसेच भारत 2023-25 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.
advertisement
आगरकर यांच्या कार्यकाळात संघात मोठा बदलही घडून आला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर रविचंद्रन अश्विन यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तसेच हार्दिक पांड्या यांना संभाव्य कर्णधार मानले जात असतानाही आगरकर यांनी धाडसी निर्णय घेत सूर्यकुमार यादव यांची टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या निर्णयाबाबत बोलताना आगरकर यांनी असा युक्तीवाद केला होती की, आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळू शकेल. आम्हाला वाटते की तो या भूमिकेसाठी योग्य उमेदवार आहे.
advertisement
अलीकडेच भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी20 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजयासाठी आगरकरांचे कौतुक केले होते. आगरकर यांना अनेकदा टीका सहन करावी लागते, पण त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे हा किताब मी त्यांना समर्पित करतो, असे गंभीर यांनी म्हटले.
अजित आगरकर यांनी 1998 ते 2007 या कालावधीत भारतासाठी 26 कसोटी, 191 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले असून एकूण 349 विकेट्स घेतल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India: 2027पर्यंत मी सांगेन ती टीम निवडा, गौतम गंभीर नाही तर कोणी दिली बोर्डाला थेट ऑफर; चाहत्यांमध्ये कुजबुज सुरू
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement