Overthinking : अतिविचारांचे शारीरिक - मानसिक स्वास्थ्यावर कोणते परिणाम होतात ? अतिविचारांवर नियंत्रण कसं मिळवायचं ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अतिविचारांमुळे मनावर खूप ताण येतो. अतिविचारामुळे केवळ तुमचं मनच थकत नाही, तर त्याचा तुमच्या संपूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम होतो. पाहूयात अतिविचारामुळे होणारे परिणाम.
मुंबई : एखाद्या गोष्टीवर विचार करुन त्यावर कृती करणं वेगळं आणि एखाद्या बाबीचा अतिविचार करणं वेगळं. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सततच्या समस्यांमुळे तणाव जाणवत असेल आणि यावर खूप विचार करत असाल तर सावध व्हा.
अनेकदा काही जण क्षुल्लक गोष्टींवर वारंवार विचार करत बसतात, या स्थितीला 'अतिविचार' असं म्हणतात. ही सवय जरी सामान्य वाटत असली तरी, तिचा हळूहळू त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
अतिविचारांमुळे मनावर खूप ताण येतो. अतिविचारामुळे केवळ तुमचं मनच थकत नाही, तर त्याचा तुमच्या संपूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम होतो. पाहूयात अतिविचारामुळे होणारे परिणाम.
advertisement
केस अकाली पांढरे होणं - सतत विचार करणं आणि तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते. याचा परिणाम केसांच्या मुळांवरही होतो, ज्यामुळे केस अकाली पांढरे होतात.
निद्रानाश - अतिविचारामुळे झोपेवरही परिणाम होतो. मन सतत विचारांच्या आहारी जाते, तेव्हा ते शांत राहू शकत नाही. एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत राहता. यामुळे वेळेवर झोप न लागल्यानं झोप अपुरी राहते. यामुळे शरीराला थकवा आणि सुस्ती जाणवते.
advertisement
मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम - एखाद्या गोष्टीचा सतत विचार केल्यानं चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो. लोक लहानसहान गोष्टींना अवाजवी महत्त्व देतात, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
advertisement
निर्णयक्षमता कमी होणं - एखाद्या गोष्टीचा खूप जास्त किंवा सतत विचार करता, तेव्हा निर्णय घेणं कठीण होतं. उपलब्ध पर्यायांमुळे गोंधळून जाता आणि हतबल होता. यामुळे आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
शारीरिक आरोग्यावर परिणाम - अतिविचार केवळ मनापुरता मर्यादित नाही. त्यामुळे डोकेदुखी, उच्च रक्तदाब, थकवा आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. दीर्घकाळचा ताण शरीराला आतून कमजोर करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 8:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Overthinking : अतिविचारांचे शारीरिक - मानसिक स्वास्थ्यावर कोणते परिणाम होतात ? अतिविचारांवर नियंत्रण कसं मिळवायचं ?






