राज ठाकरेंचं मिशन 'महाराष्ट्र नेक्स्ट' काय आहे? ब्लुप्रिंटनंतर मनसेचं मोठं पाऊल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
MNS Maharashtra Next Website: मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी 'महाराष्ट्र नेक्स्ट' संकेतस्थळाचे लोकार्पण केले.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेशी महाराष्ट्र हिताचा संवाद साधण्याकरीता नव्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. २०१४ साली जाहीर केलेल्या विकास आराखड्यानंतर मनसेने आणखी एक मोठे पाऊल टाकले. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सर्वसामान्य लोकांना विविध विषयांवर त्यांची मते व्यक्त करता यावीत, यासाठी राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र नेक्स्ट' नावाची वेबसाईट सुरू केली.
मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेत राज्यातली आणि देशातली सध्याची राजकीय परिस्थिती, इराण इस्त्रायल युद्ध, मुंबई महापालिका निकाल, मनसेची आतापर्यंतची वाटचाल अशा विषयावर राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठीजणांची असलेली भूमिका त्यांनी आदरपूर्वक नमूद केली. प्रत्येक सन्माननीय मराठीजणांचे नाव घेऊन 'प्रतिमांमध्ये' अडकू नका तर त्यांच्या 'प्रतिभा' लक्षात घ्या, असे आवाहन केले.
advertisement
राज ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र नेक्स्ट' काय आहे?
महाराष्ट्र मोबाईलमध्ये अडकून गेलाय. मोबाईलमधून बाहेर पडा. उद्याचा महाराष्ट्र आपल्यालाच घडवायचा आहे, असे सांगत महाराष्ट्राविषयीच्या आपल्या कल्पना मनसेच्या 'महाराष्ट्र नेक्स्ट' या संकेतस्थळावर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. एकूण 27 विषयांवर सामान्य माणसांना मते नोंदवता येणार आहेत. सर्वसामान्यांकडून आलेल्या कल्पना सरकारकडे देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
advertisement
'मिशन महाराष्ट्र नेक्स्ट' मनसेसाठी लकी ठरणार?
एकूण २७ विषयांवर लोकांना मते मांडता येणार आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे २७ आकड्याचा मुलांक ९ असा होतो. ९ आकडा मनसेसाठी लकी मानला जातो. त्यामुळे हा उपक्रम मनसेसाठी लकी ठरेल का हे पाहणं महत्वाचं असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरेंचं मिशन 'महाराष्ट्र नेक्स्ट' काय आहे? ब्लुप्रिंटनंतर मनसेचं मोठं पाऊल








