advertisement

मिनरल वॉटर विक्री व्यावासाय करू; पेट्रोल पंप चालकाला मित्रानं विश्वासात घेतलं अन् मग पुण्यात मोठं कांड

Last Updated:

मिनरल वॉटर विक्री व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप चालकाची फसवणूक करण्यात आली. व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पेट्रोल पंप चालकाची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पेट्रोल पंप चालकाची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : शेअर बाजार असो वा नवा व्यवसाय, गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात मिनरल वॉटर विक्री व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप चालकाची फसवणूक करण्यात आली. व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी हडपसर परिसरातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रीचा फायदा घेत केला गेम
तक्रारदार व्यावसायिक हे हडपसरमधील हांडेवाडी भागात राहतात. आरोपींचे हडपसरमध्येच कपड्यांचे दुकान असून, फिर्यादी आणि आरोपींची जुनी ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांना "मिनरल वॉटर व्यवसायात मोठी गुंतवणूक करा, त्यातून छप्परफाड नफा मिळेल," असे आमिष दाखवले. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन्ही पक्षांमध्ये रीतसर भागीदारी करार करण्यात आला.
advertisement
अशी झाली फसवणूक
करारानुसार, फिर्यादीने व्यवसायासाठी १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये गुंतवले. मात्र, फसवणुकीचा खेळ तिथेच थांबला नाही. जून ते ऑक्टोबर २०२५ या काळात पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीतून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी व्यवसायाच्या खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवले.
जेव्हा फिर्यादीने नफ्याचा हिशोब मागितला, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मिनरल वॉटर विक्री व्यावासाय करू; पेट्रोल पंप चालकाला मित्रानं विश्वासात घेतलं अन् मग पुण्यात मोठं कांड
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement