advertisement

पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! निगडी मेट्रोची डेडलाईन ठरली; 40 लाख लोकसंख्येच्या पाणीप्रश्नावरही सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.

निगडी मेट्रोची डेडलाईन ठरली (फाईल फोटो)
निगडी मेट्रोची डेडलाईन ठरली (फाईल फोटो)
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा विस्तार, वाढती पाणी टंचाई आणि नदी सुधारणा यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.
शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या पार गेल्याने ७५० एमएलडी पाण्याची गरज आहे, मात्र सध्या केवळ ६२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे ५२० एमएलडी आणि आंध्रा धरणातून १०० एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, भामा-आसखेड प्रकल्पाच्या संथ कामाबद्दल सरकारने कडक पाऊल उचलत संबंधित ठेकेदाराला निलंबित केले आहे.
advertisement
नदी सुधार आणि प्रदूषण मुक्ती
मुळा नदी सुधार योजनेचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून, पवना आणि इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी एक संयुक्त आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
advertisement
आमदार खापरे यांनी केवळ मेट्रो आणि पाणीच नव्हे, तर शहरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न, नवीन न्यायालय इमारतीचे काम आणि वाहतूक कोंडी यांसारख्या १० महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधांचा वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर बोलताना मंत्री सामंत यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! निगडी मेट्रोची डेडलाईन ठरली; 40 लाख लोकसंख्येच्या पाणीप्रश्नावरही सरकारचा मोठा निर्णय
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement