Weather Alert: वादळी पाऊस, गारपीट अन् पुन्हा 'तो' अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 48 तास महत्त्वाचे!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी संकट कायम आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा अलर्ट जारी केला आहे.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्च महिन्यात उन्हाळा आणि उष्णता असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा प्रभाव दिसत आहे. सध्या वेस्टर्न डिस्टरबन्स आणि चक्रीवादळी प्रणालीमुळे हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विजांचा कडकडाट, गारपीट आणि सोसाट्याचा वारा यांसह तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, 21 मार्चपासून तीव्रता कमी होणार असून पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, आणि अहमदनगर जिल्ह्यांत हवामानात बदल झाले असून अवकाळी संकट टळलं आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32-36 अंशांपर्यंत राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







