advertisement

Rupali Chakankar: खरात गुरू, ऑफिस बॉय अन् 'त्या' तरुणीची तक्रार, रुपाली चाकणकरांनी सगळंच खोडून काढलं

Last Updated:

सामाजिक आयुष्य जगत असताना कुणाला कुणाला तरी गुरू मानत असतो. खरात यांना आम्ही गुरू मानलं, त्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम असेल, महाशिवारात्रीचा कार्यक्रम असेल, त्यावेळी आम्ही उपस्थितीत राहत होतो

News18
News18
मुंबई: विकृत कॅप्टन अशोक खरात अटकेच्या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पण, या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे चाकणकर यांना आपलं पद गमवावं लागलं. पण, खरात याला आम्ही गुरू मानलं होतं. गुरूपौर्णिमेला आम्ही पाद्यपूजन केलं होतं, पण तो माणूस असा निघेल असं आम्हाला माहिती नव्हतं, असं म्हणत चाकणकर यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे स्पष्टीकरण दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर  महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर  जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या  पदाचा राजीनामा सुपूर्द केला. देवगिरी बंगल्यावरून बाहेर आल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खरातला गुरू का मानलं? 
""शिवलिका संस्थानमध्ये मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून तिथे काम केलं. समाजातील अनेक प्रतिष्ठीत  व्यक्ती आणि अनेक मान्यवर व्यक्ती त्या ट्रस्टवर होते. या ट्रस्टवर होते, त्यानंतर आयोगाची अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट २०२५ रोजी या ट्रस्टचा कार्यकाळ संपला होता.  सामाजिक आयुष्य जगत असताना कुणाला कुणाला तरी गुरू मानत असतो. खरात यांना आम्ही गुरू मानलं, त्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम असेल, महाशिवारात्रीचा कार्यक्रम असेल, त्यावेळी आम्ही उपस्थितीत राहत होतो. गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने ती पाद्यपूजन केलं होतं. ५ ते ६ वर्ष संपर्कात होतो. या देवस्थानशी माझ्या कुटुंबीयाचा संबंध होता, पण खरात आणि त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल काही माहिती नव्हतं. माझं कुटुंब हे वारकरी होतं, आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिका दृष्टीकोनातून होती. म्हणून आम्ही या कुटुंबाशी जोडलो होतो. वर्षभरातून आम्ही कार्यक्रमाला हजर राहत होते. जे काही घडलं ते अत्यंत गलिच्छ आहे, घाणेरेड कृत्य आहे, पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, पोलिसांनी कारवाई करावी, असं चाकणकर यांनी सांगितलं.
advertisement
पत्रकाराला फोन का केला? 
"मला दोन गोष्टी प्रकर्षाने सांगायचं आहे, काल एक पत्रकार खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वृतपत्रात  एक बातमी दिली होती, १९ ३ २०२५ रोजी बातमी दिली होती. आमच्या समुपदेशाकडे ती बातमी आली. समुपदेशाने त्यांनाा ८ तारखेला पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता, आपल्याकडे काही माहिती असेल तर द्यावी. दुसरं पत्र होतं पोलीस अधिक्षकांना दिलं होतं, जी काही माहिती असेल तर ती द्यावी, काही कारवाई करावी. माझ्या कार्यालयातून पत्रकाराला फोन गेला होता, काही पुरावे आहे का पोलिसांकडे जाऊन तक्रार कराावी, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सांगितलं कोणतीही माहिती नाही. कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे आयोगाकडे पत्र पाठवलं, आमच्याकडे कोणतीही माहिती नाही' असा खुलासाही चाकणकर यांनी केला.
advertisement
दोन दिवसांपासून चुकीची माहिती, बातमी पसरवली जात आहे, ती चुकीची आहे त्याबद्दल निषेध व्यक्त करते. ५ मार्च रोजी मला एक मेल आला, या संबंधित मेल मध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची तक्रार होती. आमचं पत्र त्याच दिवशी पोलिसांना पत्र पाठवलं होतं. आम्ही पोलिसांना पत्र पाठवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी माझ्या आयोग कार्यालयामध्ये १७ तारखेला लागली होती. या सुनावणीमध्ये पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं कारवाई करत होते. कुणालाही मागे घातलं नाही, तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं. पण त्यांच्याकडे नाव करणाऱ्या तरुणाचं नाव होतं, कारवाईचे आदेश दिले होते. तेजस्वी सातपुते यांचं पत्र होतं १७ मार्च रोजी एका महिलेची तक्रार होती. कार्याालयात काम करणाऱ्या एका तरुणाची ही तक्रार होती, असा खुलासाही त्यांनी केला.
advertisement
'सुषमा अंधारे, ठोंबरेंना नोटीस पाठवणार'
"अशा प्रकार दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या चालू आहे. एखादी व्यक्ती कशी पुढे जाऊन वागते, ते कुणाला माहिती नव्हतं. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, खरात देवस्थानशी आम्ही जोडलो होतो. आमचे तिथे फोटो तिथे होते. देवस्थानमध्ये होते. तिथे आमचे फोटो होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी होते. आमच्यासोबत अनेक लोकांचे फोटो तिथे होते पण दोन दिवसांपासून आम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते चुकीचं आहे.  काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन चुकीचे आरोप केले. तसंच पसरवलं गेलं. हा फोटो आहे १२ सप्टेंबर रोजीचा आहे. एक तारीख खोडली आणि अमावश्या दाखवली, ते फोटो २ सप्टेंबरचे फोटो होते. माझ्या हाताला कुठेही जखम नव्हता. हा ४ सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही माझ्या हाताला जखम नाही. कायद्यााच्या चौकटीतून नोटीस पाठवू, अश्लिल टीका करणे, खोट्या बातम्या पसरवणे, यांच्याबद्दल नोटीस पाठवणार आहे, असा इशाराही चाकणकारांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar: खरात गुरू, ऑफिस बॉय अन् 'त्या' तरुणीची तक्रार, रुपाली चाकणकरांनी सगळंच खोडून काढलं
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement