Hair Care : काळ्याभोर केसांसाठी या बिया नक्की खा, केस मुळापासून होतील मजबूत, दिसतीलही सुंदर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भोपळ्याच्या बिया, जवस आणि चिया सीड्समधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. यामुळे केसांच्या मुळांचं पोषण तर होतच आणि टाळूदेखील निरोगी ठेवतात. या बियांमधल्या घटकांमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि सूज कमी होते ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात.
मुंबई : केस नैसर्गिकरित्या सुंदर दिसावेत ही सगळ्यांचीच इच्छा असते. काळ्याभोर केसांसाठी ही माहिती महत्त्वाची.
केस चांगले दिसण्यासाठी बऱ्याच ट्रिटमेंट उपलब्ध आहेत. पण केस जर मुळातच सुंदर दिसायला हवे असतील तर यात आहाराचं महत्त्वही तितकंच आहे. त्यामुळे आहारात तसे पोषक घटक असणंही तितकंच गरजेचं.
प्रकृती निरोगी राहावी यासाठी जसा आहार महत्त्वाचा तसाच तो केसांच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी काही बिया पोषक ठरतात.
advertisement
भोपळ्याच्या बिया, जवस आणि चिया सीड्समधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. यामुळे केसांच्या मुळांचं पोषण तर होतच आणि टाळूदेखील निरोगी ठेवतात. या बियांमधल्या घटकांमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि सूज कमी होते ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात.
भोपळ्याच्या बिया म्हणजे पोषक घटकांचा खजिना. यामधे झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिनं असतात, हे सर्व घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जातात. या बिया भाजून, सूपमधे आणि सॅलडमधे घालून खाऊ शकता.
advertisement
जवसामधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, यामुळे केसांच्या मुळांचं पोषण होतं. त्यात लिग्नॅन्स आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील मोठ्या प्रमाणात असतात. केसांच्या वाढीसाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. आहारात जवस नियमित खाल्ल्यानं केसांची लांबी वाढण्यास मदत होऊ शकते.
advertisement
चिया सीड्सचा वापर प्रामुख्यानं वजन कमी करण्यासाठीच केला जातो. पण, त्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात, जे केसांच्या वाढीला मदत करू शकतात. स्मूदी किंवा दह्यातही याचा वापर करु शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 11:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : काळ्याभोर केसांसाठी या बिया नक्की खा, केस मुळापासून होतील मजबूत, दिसतीलही सुंदर