Healthy Snacking : डाएट टिप्स पाळूनही वजन कमी होत नाही ? या चुकांमुळे येऊ शकते बाधा, लगेच करा बदल
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आरोग्यदायी पदार्थ खाऊनही काहींचं वजन वाढतं. कारण आरोग्यकारक असले तरी, ते शून्य-कॅलरीयुक्त नसतात. त्यामुळे, आरोग्यदायी पदार्थ काळजीपूर्वक आणि प्रमाणात खाल्ले नाहीत तर वजन वाढू शकतं.
मुंबई : खाणं आणि वजन कमी करणं याचा घनिष्ट संबंध आहे. पदार्थ, गुणवत्ता, त्याचे पौष्टिक गुणधर्म यावर त्याचे शरीरावर होणारे परिणाम अवलंबून असतात.
वजन कमी करण्यासाठी, दिवसातून तीन वेळा जेवणासोबत हलका नाश्ता करण्याचा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला असेल. हा सल्ला ऐकला असेल पण त्याचं पालन नीट झालं नसेल तर वजन वाढू शकतं.
आरोग्यदायी पदार्थ खाऊनही काहींचं वजन वाढतं. कारण आरोग्यकारक असले तरी, ते शून्य-कॅलरीयुक्त नसतात. त्यामुळे, आरोग्यदायी पदार्थ काळजीपूर्वक आणि प्रमाणात खाल्ले नाहीत तर वजन वाढू शकतं.
advertisement
एखादी गोष्ट आरोग्यदायी वाटते, तेव्हा आपला मेंदू विचार न करताच ती खाण्यासाठी संकेत पाठवतो. उदाहरणार्थ, बदाम आणि अक्रोड आरोग्यदायी आहेत, पण त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे, आपण दिवसातून अनेक वेळा फक्त बदाम किंवा अक्रोड खाल्ले, तर आपल्या कॅलरी वाढणार हे नक्की.
advertisement
बाजारात मिळणारे डाएट मिक्स, कमी चरबीचं दही किंवा साखरविरहित बिस्किटं अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. चव टिकवून ठेवण्यासाठी, कंपन्या कमी चरबीच्या उत्पादनांमधे अतिरिक्त साखर आणि साखरविरहित उत्पादनांमधे कृत्रिम गोडवा आणणारे जिन्नस घालतात. हे घटक शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवतात, ज्यामुळे चरबी साठते.
लिक्विड कॅलरी - आपण स्मूदी, ताज्या फळांचा रस किंवा नारळाचं पाणी यांना आरोग्यदायी नाश्ता मानतो, पण फळांचा रस काढल्यानं त्यातलं फायबर निघून जातं, ज्यामुळे शरीरात साखरेचं शोषण वेगानं होतं. यामुळे वजन वाढू शकतं.
advertisement
विचार न करता खाणं - आपण काम करत असताना किंवा टीव्ही पाहताना किती खातो, याकडे लक्ष जात नाही, त्यामुळे याबद्दल सावध राहा. वजन कमी करण्यासाठी मखाणा उत्तम आहे, पण जर न मोजता तुपात भाजलेल्या मखाण्याचा संपूर्ण बॉक्स खाल्लात, तर वजन कमी होण्याऐवजी ते वाढेल.
advertisement
स्मार्ट स्नॅकिंगसाठी काही महत्त्वाच्या टिप्स
लहान वाटीत पदार्थ वाढा, म्हणजे तुम्ही किती खात आहात हे तुम्हाला कळेल.
पदार्थात प्रथिनं आणि फायबर यांचं मिश्रण असू द्या.
अनेकदा तहान लागल्यामुळे काही खाण्याची इच्छा होते. म्हणून आधी एक ग्लास पाणी प्या.
डाएट किंवा फिटनेस स्नॅक्सऐवजी, घरी भाजलेले चणे किंवा उकडलेले मोड आलेलं धान्य खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 8:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Snacking : डाएट टिप्स पाळूनही वजन कमी होत नाही ? या चुकांमुळे येऊ शकते बाधा, लगेच करा बदल










