advertisement

Gooseberry Dangers : आवळ्याचे दुष्परिणाम माहितीये? 'या' लोकांना देऊ शकतो त्रास, खात असाल तर सावध व्हा..

Last Updated:

Gooseberry side effects : आवळ्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही. त्यातल्या काही घटकांमुळे तो काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. ज्या लोकांना आधीपासूनच काहीतरी समस्या आहेत त्यांनी आवळा खाऊ नका.

आवळ्याचे दुष्परिणाम
आवळ्याचे दुष्परिणाम
मुंबई : आवळ्याचे फायदे सर्वांनाच थोडे फार का होईना माहित आहेत. आवळा आपले केस, त्वचा आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतो. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचनक्रिया सुधारतो आणि साखरेची पातळी नियंत्रित करतो. आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्त्व आहे. पण तरीही या आवळ्याचे काही दुष्परिणामही आपल्या शरीरावर होऊ शकतात.
'जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी'मध्ये आवळ्याबद्दलचं एक संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनानुसार, आवळ्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही. त्यातल्या काही घटकांमुळे तो काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. ज्या लोकांना आधीपासूनच काहीतरी समस्या आहेत त्यांनी तर आवळा अजिबात खाऊ नका.
या लोकांनी खाऊ नका आवळा..
- ज्या लोकांचा रक्तदाब म्हणजेच बीपी कमी आहे, त्यांनी आवळा खाऊ नका. आवळा रक्तदाब नियंत्रित करतो, रक्ताभिसरण सुधारतो. पण तो उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी आवळा खाल्ला तर त्यांना चक्कर येणं, अस्पष्ट दृष्टी, शुद्ध हरपणे असे त्रास होऊ शकतात. जे लोक रक्तदाबाची औषधं घेत आहेत, त्यांनी डॉक्टरांना विचारूनच आवळा खावा.
advertisement
- जे लोक रक्त पातळ करणारी औषधं घेत आहेत, त्यांनी आवळा खाऊ नये. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी ऍस्पिरिनसारखी औषध घेतात. त्यांनी आवळा खाल्ल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. कारण आवळ्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात.
- तुमची एखादी शस्त्रक्रिया होणार असेल किंवा दातांची प्रक्रिया होणार असेल तर किमान दोन आठवडे आधी आवळा खाणं पूर्णपणे बंद करा. त्याचबरोबर तुम्ही काही सप्लिमेंट्स घेत असाल तर तेही तुमच्या डॉक्टरला नक्की सांगा.
advertisement
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास पोटदुखी किंवा अतिसार यांचा होऊ शकतो. यामुळे शरीराला योग्य पोषक तत्वे मिळत नाहीत. म्हणून अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवळा खा.
- किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनीही आवळा खाऊ नका. कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यामुळे शरीरात ऑक्सलेट्स तयार होऊ शकतात. म्हणून किडनी स्टोन असलेल्या लोकांनी आवळा खाल्ल्यास त्यांचे स्टोन वाढून वेदना होऊ शकतात.
advertisement
- काही लोकांना फळं किंवा बेरीची ऍलर्जी असते. त्यांनी आवळा खाणं टाळा. अशा लोकांनी आवळा खाल्लाच आणि त्यांना खाल्ल्यानंतर ओठांना किंवा जिभेला सूज, पुरळ, खाज किंवा पोटात दुखणे अशा समस्या आल्या तर तो त्यांच्यासाठी योग्य नाही. आवळा खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास किंवा कोणतीही गंभीर प्रतिक्रिया जाणवली तर त्वरित डॉक्टरांची भेट घ्या.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gooseberry Dangers : आवळ्याचे दुष्परिणाम माहितीये? 'या' लोकांना देऊ शकतो त्रास, खात असाल तर सावध व्हा..
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement