'23 वर्षांमध्ये अन्याय झाला...', वर्णद्वेषाचे आरोप, टीम इंडियाच्या दिग्गजाचा तडकाफडकी राजीनामा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाच्या माजी खेळाडूने वर्णद्वेषाचे आरोप करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून या क्रिकेटपटूने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या माजी खेळाडूने वर्णद्वेषाचे आरोप करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून या क्रिकेटपटूने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णनने बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्याला टॉसची घोषणा करण्याची आणि प्रेझेंटेशनची संधी दिली गेली नाही, कदाचित माझा रंग हे याचं कारण असेल, असं शिवरामाकृष्णन म्हणाला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विननेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवरामाकृष्णनचे आरोप
मी बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे, अशी घोषणा शिवरामाकृष्णन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. 'मला 23 वर्षांमध्ये टॉस आणि प्रेझेंटेशनच्या वेळी संधी दिली गेली नाही. आज नवीन लोक टॉस आणि पिच रिपोर्ट करत आहेत', असा आरोप शिवरामाकृष्णनने केला.
शिवरामाकृष्णनने त्याच्या वक्तव्यामध्ये कुठेही थेटपणे बीसीसीआयवर आरोप केले नाहीत, पण त्याच्या पोस्टवर एका व्यक्तीने तुझा रंग असा असल्यामुळे झालं असेल, अशी कमेंट केली, या कमेंटवर शिवरामाकृष्णन यांनी सहमत असल्याचं सांगितलं, त्यामुळे हा वाद वाढला.
advertisement
If I have not been used for TOSSES and PRESENTATION for 23 years and new comers come in do pitch report Tosses Presentation even when Shastri was coaching, what do you think could be the reason
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
advertisement

I am retiring from commentary for BCCI
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
भारताचा माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण शिवरामाकृष्णन यंदा आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही, याबद्दल अश्विनने खेद व्यक्त केला. शिवरामाकृष्णनच्या या आरोपानंतर काही यूजर्सनी त्याला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली.
advertisement
लक्ष्मण शिवरामाकृष्णन हा लेग स्पिनर होता, त्याने भारताकडून 9 टेस्ट मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 16 वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 15 विकेट आहेत. 1983-1987 दरम्यान शिवरामाकृष्णन टीम इंडियाकडून खेळला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'23 वर्षांमध्ये अन्याय झाला...', वर्णद्वेषाचे आरोप, टीम इंडियाच्या दिग्गजाचा तडकाफडकी राजीनामा!








