advertisement

Mumbai Metro: ॲक्वा लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज'; प्रवाशांसाठी बंद असलेला 'हा' मार्ग अखेर सुरू

Last Updated:

मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. प्रवाशांसाठी बंद असलेला मार्ग अखेर सुरू झाला आहे.

News18
News18
मुंबई: मेट्रो प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. प्रवाशांच्या सोयीने मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) ने विधान भवन मेट्रो स्टेशनच्या A- 2 गेटवरील लिफ्टची सुविधा सामान्य प्रवाशांसाठी सुरूवात करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाशांना ये- जा करणं आता शक्य झालं आहे. 'मुंबई मेट्रो 3' च्या इन्स्टाग्राम पेजवरून ही माहिती दिलेली आहे.
'मुंबई मेट्रो 3' च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, "विधानभवनावरील A- 2 गेटवरून सामान्य प्रवाशांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन्हीसाठी सुरू झालेले आहे." लिफ्ट सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि गर्दीच्या वेळी स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, A- 2 गेटच्या एक्झिटमुळे मनोरा– नवीन आमदार निवास आणि वाय. बी. चव्हाण सेंटर या दोन्ही ठिकाणी थेट प्रवेश मिळतो, जिथे नियमित वर्दळ असते. यामुळे, गर्दी लवकरात लवकर कमी होते आणि स्थानकातील इतर प्रवेशद्वारांवरील कोंडी कमी सुद्धा कमी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by MumbaiMetro3 (@mumbaimetro3)



advertisement
विधान भवन मेट्रो स्थानकावरील B- 4 गेट सुरू झाल्याच्या एक महिन्यानंतर A- 2 गेटबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. B- 4 गेट प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले असले तरी, गेट B- 5 अजूनही बंद असून ते 25 मार्च रोजी पुन्हा उघडणार आहे. अधिकार्‍यांनी यापूर्वी माहिती दिली आहे की, सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीवरील निर्बंधांमुळे काही गेट्स तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक होते. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी, कारण स्थानकातील एन्ट्रीचे रूट्स काही प्रमाणावर बंद असल्यामुळे प्रवाशांना येण्या- जाण्यासाठी परिणाम होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: ॲक्वा लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज'; प्रवाशांसाठी बंद असलेला 'हा' मार्ग अखेर सुरू
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement