advertisement

'स्ट्रगलर साला' टीम पुन्हा एकत्र? 'मामाच्या गोव्याला जाऊया'; विजू मानेंचा नवा सिनेमा चर्चेत

Last Updated:

'स्ट्रगलर साला'चा नवीन सीझन कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असताना विजू माने यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 

News18
News18
युट्यूबर प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या काही मराठी सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे स्ट्रगल साला. संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके हे त्रिकुट आणि दिग्दर्शक विजू माने यांच्या या सीरिजने युट्यूबवर भरगोस यश मिळवलं. 'स्ट्रगलर साला'चा नवीन सीझन कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असताना विजू माने यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
advertisement
'स्ट्रगलर साला' या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा तरुणाईच्या जवळचा विषय घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते. फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
चित्रपटाची नेमकी कथा आणि कलाकारांची फळी अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. स्ट्रगरल सालाची टीम म्हणजेच, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके हे त्रिकुट पुन्हा एकत्र दिसणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितलं, "स्ट्रगलर सालाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे. त्या सीरिजमधील मैत्री आणि मस्ती लोकांच्या मनाला भिडली. त्याच भावनेतून ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ही कल्पना आकाराला आली. या चित्रपटातून प्रेक्षकांना मनमुराद हसण्याचा, मित्रांसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून देणारा आणि थोडासा नॉस्टॅल्जिक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन केला जातो आणि तो फसतो, अशाच मित्रांची ही कहाणी आहे. हलक्याफुलक्या शैलीत सांगितलेली ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल."
advertisement
हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मैत्रीचा रंगतदार जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही धमाल सफर प्रेक्षकांना केवळ हसवणारच नाही, तर आपल्या मित्रांसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देणारी ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'स्ट्रगलर साला' टीम पुन्हा एकत्र? 'मामाच्या गोव्याला जाऊया'; विजू मानेंचा नवा सिनेमा चर्चेत
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement