Children Health : लहान मुलांच्या तब्येतीसाठी महत्त्वाची माहिती, लक्षणांबद्दल राहा सजग, असू शकतात अशक्तपणाची चिन्हं
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लहान मुलांचं आरोग्य त्यांच्या पोषणाशी थेट निगडित असतं. अनेकदा अपुऱ्या पोषणामुळे किंवा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे मुलांमधे अशक्तपणा आणि विकासात्मक समस्या निर्माण होतात. मुलांमधे लोह आणि कॅल्शियमची कमतरता बहुतेकदा आढळते.
मुंबई : लहान मुलांच्या तब्येतीकडे पालकांचं लक्ष असतंच, कारण त्यांना काही त्रास होत असेल, अशक्त वाटत असेल तर त्यांना सांगता येईलच असं नाही. प्रकृतीतल्या चढ उतारांमुळे मुलांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
लहान मुलांचं आरोग्य त्यांच्या पोषणाशी थेट निगडित असतं. अनेकदा अपुऱ्या पोषणामुळे किंवा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे मुलांमधे अशक्तपणा आणि विकासात्मक समस्या निर्माण होतात. मुलांमधे लोह आणि कॅल्शियमची कमतरता बहुतेकदा आढळते.
ही कमतरता हळूहळू जाणवते आणि सुरुवातीला ही लक्षणं सौम्य असतात, ज्याकडे पालक अनेकदा दुर्लक्ष करतात. लवकर निदान आणि योग्य काळजी घेतली तर या समस्या टाळता येऊ शकतात.
advertisement
लोहाच्या कमतरतेची लक्षणं - मुलाचा चेहरा फिकट दिसत असेल, ते लवकर थकत असतील किंवा त्यांची भूक कमी झाली असेल, तर हे लोहाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. काही मुलांमधे चिडचिडही वाढते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुलांची हाडं कमकुवत होऊ शकतात. दातांची वाढ उशिरा होणं, स्नायू कमकुवत होणं किंवा वारंवार दात पडणं ही त्याची लक्षणं आहेत.
advertisement
लोह शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतं, यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेला जातो. हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे.
advertisement
आहारात बदल - मुलाच्या आहारात हिरव्या भाज्या, फळं, कडधान्यं आणि दुधाचा समावेश करा. पालक, सफरचंद, केळी आणि दही यांसारखे पदार्थ खूप फायदेशीर आहेत. मुलांमधे सतत अशक्तपणा किंवा इतर कोणतीही लक्षणं दिसत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज भासली तर डॉक्टर सप्लिमेंट्स लिहून देतील.
नियमित तपासणीमुळे पोषक घटकांची कमतरता लवकर ओळखता येते, ज्यामुळे वेळेवर उपचार करणं शक्य होतं. लोह आणि कॅल्शियमच्या कमतरतेकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर त्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Children Health : लहान मुलांच्या तब्येतीसाठी महत्त्वाची माहिती, लक्षणांबद्दल राहा सजग, असू शकतात अशक्तपणाची चिन्हं









