advertisement

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मार्चच्या चौथ्या आठवड्यात दुहेरी खुशखबर, पण..

Last Updated:
Weekly Horoscope: भाग्याची साथ मिळण्यासाठी मार्चचा चौथा आठवडा काही राशींना खास असेल. ग्रहांची स्थिती अनुकूल-प्रतिकूल असण्यासोबतच काही महत्त्वाचे सण या दरम्यान येणार आहेत. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
1/8
सिंह - सिंह राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर कामाचा आणि विविध जबाबदाऱ्यांचा ताण वाढेल. करिअर आणि व्यवसायातील कामे वेळेत पूर्ण करण्याचे एक मानसिक दडपण तुमच्यावर असेल. साधी आणि छोटी कामे पूर्ण करण्यासाठी देखील तुम्हाला या आठवड्यात अधिक श्रम आणि कष्ट घ्यावे लागतील. नात्यांमधील गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुमचे जुने आणि जवळचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

2/8
सिंह - आठवड्याच्या मध्यात घरी एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. जोडीदारासोबत किंवा प्रेमीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद होऊ शकतो, ज्यामुळे मनात अस्वस्थता राहील. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात कोणताही निर्णय घाईघाईने किंवा रागाच्या भरात घेऊ नये, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामासोबतच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ऋतू बदलामुळे होणारे आजार किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. ताणतणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान धारणेचा अवलंब करा. शुभ रंग गुलाबी आणि शुभ अंक 2 आहे.

3/8
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य दिशेने वापर केला, तर त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि आनंद मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी या आठवड्यात चालून येतील. विशेषतः परदेशी कंपन्यांशी संबंधित असलेल्या किंवा आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. तुम्ही आखलेल्या योजनांना यश मिळेल आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे, तुम्हाला सहकाऱ्यांकडून पूर्ण मदत मिळेल, तुमची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करू शकाल.

4/8
कन्या - कामातील प्रगतीमुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. आठवड्याच्या मध्यात एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते, प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरेल आणि त्यातून नवीन व्यावसायिक ओळखी होतील. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभ असेल. जर तुम्ही अजून अविवाहित असाल, तर तुमच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. शुभ रंग लाल आणि शुभ अंक 3 आहे.

5/8
तूळ - सावधगिरी बाळगली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते, हे तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रकर्षाने लक्षात ठेवावे. थोडासा निष्काळजीपणा एखाद्या चांगल्या चाललेल्या कामात अडचण निर्माण करू शकतो. शारीरिक इजा किंवा अपघाताची भीती असल्याने वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, रहदारीच्या नियमांचे पालन करा. आठवड्याच्या सुरुवातीलाच अचानक मोठा खर्च समोर आल्याने तुमचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. या काळात घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घेणे हे तुमचे प्राधान्य असेल.

6/8
तूळ - नोकरीमध्ये गुप्त शत्रू किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधात कट रचू शकतात, त्यामुळे कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आपले काम स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ते दुसऱ्यावर सोपवल्यास नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असेल, नफा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने थोडा मानसिक ताण येईल. भागीदारीत असलेल्या लोकांशी मतभेद टाळा आणि सर्व कायदेशीर कागदपत्रे वेळेत तपासून पूर्ण करा. नात्यांमध्ये दिलेली आश्वासने पाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा विश्वासार्हता कमी होईल. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 9 आहे.

7/8
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्याचा मंत्र असा आहे, प्रगतीसाठी जर दोन पावले मागे जावे लागले, तर मागे हटू नका. वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत आणि समस्या सोडवण्यासाठी इतरांचे सहकार्य घेणे आणि मिळून मिसळून काम करणे फायद्याचे ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आपली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतील. आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाला जावे लागू शकते. प्रवासात असताना आपल्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या.

8/8
वृश्चिक - व्यवसायात अपेक्षित वाढ आणि नफा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अनुभवी व्यक्तींचा किंवा हितचिंतकांचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका. आठवड्याच्या मध्यात घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. मुलांच्या शिक्षणामुळे किंवा त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायाची गती थोडी मंद असली तरी प्रगती होत राहील. प्रेमसंबंधांमध्ये कोणताही दिखावा टाळा आणि एकमेकांमधील सामंजस्य वाढवण्यावर भर द्या. शुभ रंग नारंगी आणि शुभ अंक 1 आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement