advertisement

GK : साबण लाल, निळा किंवा हिरवा असला तरी त्याचा फेस नेहमी पांढराच का असतो? यामागील सायन्स 99 टक्के लोकांना माहितच नाही

Last Updated:
कदाचित आपल्याला वाटेल की ही एक साधी गोष्ट आहे, पण यामागे विज्ञानाची एक मोठी किमया दडलेली आहे.
1/7
आपल्या दिवसाची सुरुवात अंघोळीने होते. हातामध्ये सुगंधी लाल रंगाचा साबण असो किंवा निळ्या रंगाचा लक्झरी सोप लिक्विड किंवा मग हिरव्या रंगाचा एखादा आयुर्वेदिक साबण, आपण तो शरीराला चोळायला लागलो की एक गोष्ट हमखास घडते. ती म्हणजे पांढरा शुभ्र फेस तयार होणं, जे आपण लहानपणापासून आपण हे पाहत आलो आहोत. पण कधी विचार केला आहे का की, साबणाचा रंग कोणताही असला तरी त्याचा फेस नेहमी दुधासारखा पांढराच का असतो?

2/7
कदाचित आपल्याला वाटेल की ही एक साधी गोष्ट आहे, पण यामागे विज्ञानाची एक मोठी किमया दडलेली आहे. साबणच कशाला, अगदी शॅम्पू किंवा कपडे धुण्याची पावडर कोणत्याही रंगाची असली, तरी फेस मात्र आपला रंग कधीच बदलत नाही. यामागे नक्की काय कारण आहे? चला, या रंजक रहस्याचा उलगडा करूया.कदाचित आपल्याला वाटेल की ही एक साधी गोष्ट आहे, पण यामागे विज्ञानाची एक मोठी किमया दडलेली आहे. साबणच कशाला, अगदी शॅम्पू किंवा कपडे धुण्याची पावडर कोणत्याही रंगाची असली, तरी फेस मात्र आपला रंग कधीच बदलत नाही. यामागे नक्की काय कारण आहे? चला, या रंजक रहस्याचा उलगडा करूया.
कदाचित आपल्याला वाटेल की ही एक साधी गोष्ट आहे, पण यामागे विज्ञानाची एक मोठी किमया दडलेली आहे. साबणच कशाला, अगदी शॅम्पू किंवा कपडे धुण्याची पावडर कोणत्याही रंगाची असली, तरी फेस मात्र आपला रंग कधीच बदलत नाही. यामागे नक्की काय कारण आहे? चला, या रंजक रहस्याचा उलगडा करूया.
advertisement
3/7
रंगाचा नाही, तर प्रकाशाचा आहे सारा खेळवैज्ञानिकांच्या मते, साबणाच्या फेसाचा पांढरा रंग हा कोणत्याही 'पिगमेंट' किंवा रंगा मुळे नसून तो 'लाईट स्कॅटरिंग' (Light Scattering) म्हणजेच प्रकाशाच्या विखुरण्यामुळे दिसतो. जेव्हा आपण साबण पाण्यासोबत चोळतो, तेव्हा हवेच्या संपर्कात आल्यामुळे असंख्य लहान-लहान बुडबुड्यांचे एक जाळे तयार होते.

4/7
जेव्हा सूर्यप्रकाश किंवा घरातील लाईटचा प्रकाश या बुडबुड्यांवर पडतो, तेव्हा हे बुडबुडे एका पारदर्शक काचेसारखे काम न करता, प्रकाशाला सर्व दिशांनी वाकवतात. 'अमेरिकन फिजिकल सोसायटी'च्या मते, जेव्हा प्रकाशाची किरणे या हजारो बुडबुड्यांमध्ये वारंवार आदळतात आणि विखुरतात, तेव्हा प्रकाशाचे सर्व रंग एकमेकांत मिसळतात. विज्ञानाचा नियम आहे की, जेव्हा प्रकाशाच्या स्पेक्ट्रममधील सर्व रंग एकत्र येतात, तेव्हा तो आपल्याला पांढरा दिसतो.

5/7
बुडबुड्यांचा आकार ठरवतो चमकफेसाचा पांढरेपणा हा बुडबुडे किती मोठे किंवा लहान आहेत यावरही अवलंबून असतो
बुडबुडा जितका लहान असेल, तितका प्रकाश जास्त विखुरला जाईल आणि फेस अधिक चमकदार पांढरा दिसेल.
मोठ्या बुडबुड्यांमध्ये प्रकाशाचे विखुरणे कमी होते, ज्यामुळे फेस थोडासा मळकट किंवा पारदर्शक दिसू शकतो.
याला विज्ञानात Mie Scattering म्हणतात. याच तत्त्वामुळे आपल्याला आकाशातील ढग आणि दूध देखील पांढरे दिसते.
बुडबुड्यांचा आकार ठरवतो चमकफेसाचा पांढरेपणा हा बुडबुडे किती मोठे किंवा लहान आहेत यावरही अवलंबून असतोबुडबुडा जितका लहान असेल, तितका प्रकाश जास्त विखुरला जाईल आणि फेस अधिक चमकदार पांढरा दिसेल.मोठ्या बुडबुड्यांमध्ये प्रकाशाचे विखुरणे कमी होते, ज्यामुळे फेस थोडासा मळकट किंवा पारदर्शक दिसू शकतो.याला विज्ञानात Mie Scattering म्हणतात. याच तत्त्वामुळे आपल्याला आकाशातील ढग आणि दूध देखील पांढरे दिसते.
advertisement
6/7
एकटा बुडबुडा रंगीत, मग फेस पांढरा का?आपण अनेकदा पाहतो की, हवेत उडणारा साबणाचा एकटा बुडबुडा इंद्रधनुष्यासारखा रंगीत दिसतो. याला 'थिन फिल्म इंटरफेरन्स' (Thin Film Interference) म्हणतात. पण जेव्हा हेच बुडबुडे एकत्र येऊन फेस तयार करतात, तेव्हा प्रकाश इतक्या वेळा एकमेकांवर आदळतो की रंगांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो आणि केवळ पांढरा प्रकाशच बाहेर पडू शकतो.

7/7
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अंघोळ कराल आणि तो पांढराशुभ्र फेस पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की हा केवळ फेस नाही, तर प्रकाशाने खेळलेली एक सुंदर वैज्ञानिक खेळी आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अंघोळ कराल आणि तो पांढराशुभ्र फेस पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की हा केवळ फेस नाही, तर प्रकाशाने खेळलेली एक सुंदर वैज्ञानिक खेळी आहे.
advertisement
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement