advertisement

Bigg Boss Marathi 6 मध्ये नव्या वर्षाचं दमदार स्वागत; 'बिग बॉस मराठी'च्या घरातील गुढीपाडव्याची खास झलक

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Gudhipadwa : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा हा नवीन प्रोमो आहे. ज्यात घरातील गुढीपाडवा सेलिब्रेशनची ही झलक दाखवण्यात आली आहे.
1/7
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात झाली आहे. घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. अगदी बिग बॉस मराठी 6 च्या घरातही नवीन वर्षाचं दमदार स्वागत झालं आहे.

2/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. घरातील सगळे सदस्य पारंपारिक ड्रेसमध्ये दिसले. घरातील काही महिला सदस्य नववारी, नाकात नथ असा महाराष्ट्रीय लूकमध्ये दिसल्या, तर काही पुरुष सदस्य धोतर घालून आणि डोक्याला फेटे बांधून दिसले.

3/7
कोणताही सण म्हटला की गोडधोड आलंच. बिग बॉसच्या घरातील सदस्य श्रीखंड आणि इतर गोड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले.

4/7
सण म्हणजे मजामस्तीही आलीच आणि महाराष्ट्रीय सण म्हणजे फुगड्या आल्याच. बिग बॉस मराठीच्या घरातही फुगड्यांचा खेळ रंगला आहे.

5/7
दोघांची फुगडी, चौघांची फुगडी, एक हाती फुगडी असे फुगडीचे वेगवेगळे प्रकार बिग बॉस मराठी घरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

6/7
अनेकांना कठीण वाटणारी गाठोडी फुगडीही बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली. ज्यात दोन्ही पाय हातात धरून पाठीवर गोलगोल फिरतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही या गाठोड्या फुगडीत पुरुषांनीही महिलांना टक्कर दिली आहे. तन्वी, अनुश्री, सागर आणि संकेतही गाठोडी फुगडी खेळताना दिसले.

7/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत गुढीपाडव्याची ही फक्त झलक दाखवण्यात आली आहे. यावरून आज बिग बॉसच्या घरात आनंदाचं वातावरण, मजामस्ती पाहायला मिळणार हे नक्की.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement