Nashik Ramjaan Eid : रमजान ईदनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरुन वाहतूक बंद तर, 'हे' पर्यायी मार्ग खुले
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
उद्या अर्थात शनिवारी 21 मार्चला मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा सण 'रमजान ईद' साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील काही प्रमुख भागांमधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
नाशिक: नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नाशिक शहरामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने रस्ते वाहतुकीमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शनिवारी रमजान ईदच्या दिवशी शहरातील अनेक रस्त्यांमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे नाशिककरांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. नाशिकमधील काही ठराविक रस्त्यांवर
मुस्लीम बांधव एकत्र येत नमाज अदा करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी होऊ नये, या दृष्टीने काही रस्ते बंद करत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश दिले.
नाशिकच्या वाहतूक पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, रमजान ईदनिमित्त उद्या त्र्यंबक रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. शनिवारी (21 मार्च) सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतुक मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरथिका सी.एम. यांनी नाशिक शहरातल्या वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्र्यंबक नाका ते मायको सर्कल आणि गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल या मार्गांवरील दोन्हीही बाजूंची वाहतूक बंद असणार आहे. शिवाय इतरत्र काही भागांतही वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
advertisement
सारडा सर्कल, वेद मंदिराकडे जाणारा रोड घनश्याम लाँड्रीजवळ, मायको सर्कल, गोल्फ क्लब मार्गाच्या बाजूने सेंट फ्रान्सेस हायस्कुल, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, चांडक सिग्नल, जलतरण तरण सिग्नल, महापालिका आयुक्तांचा बंगला, ठक्कर बाजार मनसे पक्ष कार्यालय, आण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल नाशिक शहरातल्या या 11 प्रमुख ठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात आली आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येत असतात. त्यामुळे नाशिक शहरातल्या या भागांतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरामध्ये वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग ठरवून दिलेले आहेत.
advertisement
वाहतूक विभागाने मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारे वाहने मायको सर्कल, चांडक सर्कल आणि संदीप हॉटेलमार्गे पुढे मार्गस्थ होणार आहेत. पुढे मोडक सिग्नलकडून मायको सर्कलकडे जाणारी वाहने सीबीएस सर्कल आणि टिळकवाडी सिग्नलमार्गे पुढे मार्गस्थ होणार आहेत. गडकरी सिग्नलकडून चांडक सर्कलकडे जाणारी सर्व वाहने संदीप हॉटेलमार्गे पुढे मार्गस्थ होणार आहेत. त्यानंतर चांडक सर्कलकडून गडकरी सिग्नलकडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेल आणि मुंबई नाका मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे..
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 4:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Ramjaan Eid : रमजान ईदनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरुन वाहतूक बंद तर, 'हे' पर्यायी मार्ग खुले








