मुंबई, पुणेकरांसाठी लागू झाले नवे नियम, पगारदारांची धाकधूक वाढली; फेक रिसिटचा खेळ संपला, थेट आयकर विभागाची नजर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
New Income Tax Rules: 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या आयकर नियमांमुळे मोठ्या शहरांतील पगारदार कर्मचाऱ्यांना HRA वर अधिक कर सवलत मिळणार आहे. मात्र या सवलतीसाठी पारदर्शक व्यवहार आणि आवश्यक कागदपत्रे ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवे आयकर नियम (Income Tax Rules, 2026) येत्या 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. या नव्या नियमांनुसार देशातील काही मोठ्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यावर (HRA) अधिक कर सवलत मिळणार आहे. हे नियम 31 जुलाई 2027 रोजी दाखल केल्या जाणाऱ्या Income Tax Return (ITR) मध्ये लागू होतील.
कोणत्या शहरांना फायदा?
नव्या नियमांनुसार खालील 8 मोठ्या शहरांना अधिक HRA कर सवलतीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले आहे.
मुंबई
दिल्ली
कोलकाता
चेन्नई
हैदराबाद
पुणे
अहमदाबाद
बेंगळुरू
या शहरांमध्ये राहणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांना आता HRA वर पूर्वीपेक्षा अधिक कर सवलत मिळू शकेल.
HRA सवलत कशी ठरवली जाईल?
Rule 279 नुसार HRA सवलत खालीलपैकी सर्वात कमी रकमेच्या आधारावर ठरवली जाईल.
advertisement
- मिळालेल्या HRA ची रक्कम
- प्रत्यक्ष भरलेले भाडे वजा पगाराच्या 10%: म्हणजे जेवढे भाडे भरले त्यातून पगाराचे 10% वजा केल्यावर जी रक्कम उरेल ती
- पगाराच्या 50% किंवा 40%: मोठ्या शहरांसाठी 50% आणि इतर शहरांसाठी 40% इतकी असेल.
घर मालकाशी नाते सांगावे लागणार
नव्या नियमांनुसार आता कर्मचाऱ्यांना Form 124 मध्ये घर मालकाशी असलेल्या नात्याची माहिती द्यावी लागेल. हा नियम विशेषतः अशा प्रकरणांना लागू होईल जिथे नातेवाईकांना भाडे दिले जाते.
advertisement
कर तज्ज्ञांच्या मते आई-वडील, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांना भाडे देता येते. मात्र त्यासाठी व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि योग्य कागदपत्रे व पुरावे सादर करावे लागतील. बनावट HRA दावे रोखणे आणि पारदर्शकता वाढवणे हा सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे.
करदात्यांनी काय काळजी घ्यावी?
HRA चा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात
advertisement
1. लेखी भाडे करार करा: घर मालकासोबत लिखित Rent Agreement असणे आवश्यक आहे.
2. बँकेद्वारे भाडे भरा: भाडे भरताना बँक ट्रान्सफर किंवा चेकचा वापर करा. रोख रक्कम देणे टाळा.
3. घर मालकाने ITR मध्ये भाडे उत्पन्न दाखवावे: घर मालकाने आपल्या आयकर विवरणपत्रात भाड्याचे उत्पन्न नमूद करणे आवश्यक आहे.
1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे हे नवे आयकर नियम पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. मोठ्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना HRA वर अधिक सवलत मिळणार असली तरी पारदर्शक व्यवहार आणि योग्य कागदपत्रे ठेवणे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्व पगारदार कर्मचाऱ्यांनी वेळीच या नव्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 4:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
मुंबई, पुणेकरांसाठी लागू झाले नवे नियम, पगारदारांची धाकधूक वाढली; फेक रिसिटचा खेळ संपला, थेट आयकर विभागाची नजर









