Jackfruit Biryani : नॉनव्हेजलाही टक्कर देते ही झणझणीत फणसाची बिर्याणी, पाहा स्टेप बाय स्टेप बनवण्याची पद्धत..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Jackfruit Biryani Recipe : आज म्ही तुम्हाला एक जबरदस्त चवीची वेगळी बिर्याणी रेसिपी सांगत आहोत. ही बिर्याणी फणस टाकून बनवतात. चवीला ही बिर्याणी अप्रतिम लागते.
मुंबई : आपल्याकडे बिर्याणी लव्हर्स खूप आहेत. पण सर्वचजण चिकन किंवा मटण बिर्याणी खात नाहीत. अशा लोकांसाठी व्हेज बिर्याणी बनवली जाते. बहुतेकवेळा अनेक भाज्या मिक्स करून, कधीतरी पनीर टाकून किंवा सोयाबीन चंक्स टाकून ही बिर्याणी बनवतात. पण आज म्ही तुम्हाला एक जबरदस्त चवीची वेगळी बिर्याणी रेसिपी सांगत आहोत.
ही बिर्याणी फणस टाकून बनवतात. फणसाला मसाल्यामध्ये मॅरीनेट केल्यानंतर ते अगदी नोंव्हेजच्या पिससारखे दिसतात. चवीला तर ही बिर्याणी अप्रतिम लागते. ही फणस बिर्याणीची रेसिपी childbyheart11 या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली गेली आहे.
फणस बिर्याणीसाठी साहित्य..
फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला फणस आणि त्यासोबत बिर्याणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तळलेला कांदा, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, हिरवी मिरची, दही, मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
अशी बनवा झणझणीत फणस बिर्याणी..
- सर्वात आधी हाताला आणि चाकूला तेल लांबून फणसाचे तुकडे करा.
- बिर्याणीसाठी नेहमी लहान कराचा दफणस वापरा.
- त्यानंतर एका कुकरमध्ये पाणी फणसाचे तुकडे आणि मीठ घालून शिजवा.
- आता एक भांड्यात बिर्याणीचे लांब आकाराचे तांदूळ घ्या आणि ते स्वच्छ धुवा.
- त्यानंतर गॅसवर एक मोठं पटेल ठेवा. त्यामध्ये भरपूर पाणी टाका.
advertisement
- आता या पाण्यात लवंग, मिरे, वेलची, तमालपत्र आणि जिरं टाका.
- त्यानंतर थोडं तेल आणि मीठ टाका. शेवटी तांदूळ टाका आणि 60 टक्के शिजवून घ्या.
- त्यानंतर एका मोठ्या भांड्यात किंवा बिर्याणीच्या भांड्यात तेल टाका.
- आता या तेलामध्ये शिजवलेले फणसाचे तुकडे टाकून परतून घ्या.
- त्यानंतर हे फॅन एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तळलेला कांदा, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, हिरवी मिरची, दही आणि मीठ टाका.
advertisement
- हे सर्व व्यवस्थित एकत्र करून हे मॅरिनेशन 10 मिनिटांसाठी तसंच ठेवा.
- त्यानंतर ज्या भांड्यात आपण फणसाचे तुकडे परतले होते त्यामध्ये हे मॅरिनेशन टाका.
- यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटनासाठी कमी आचेवर शिजू द्या.
- आता यापैकी आर्ष मिश्रण काढून घ्या लेअरिंग करण्यासाठी.
- यानंतर भांड्यामधे फणसाच्या मिश्रणावर शिजवलेले अर्धे तांदूळ टाका. त्यावर बाजूला ठेवलेले फणसाचे मिश्रण आणि शेवटी पुन्हा तांदूळ टाका.
advertisement
- वरून तुमची इच्छा असल्यास तुम्ही टोमॅटो, लिंबू आणि तळलेला कांदा टाकू शकता.
- आता भांड्याचे झाकण लावा आणि हे सर्व 15 ते 20 मिनिटनासाठी कमी आचेवर शिजू द्या.
advertisement
तर अशाप्रकारे तुमची फणसाची बिर्याणी तयार आहे. तुम्ही ही बिर्याणी रायत्यासोबत सर्व्ह करू शकता. तिखटाचे प्रमाण कमी कराल तर ही बिर्याणी मुलंही आवडीनं खातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Jackfruit Biryani : नॉनव्हेजलाही टक्कर देते ही झणझणीत फणसाची बिर्याणी, पाहा स्टेप बाय स्टेप बनवण्याची पद्धत..







