Ashok Kharat: अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात, स्टेशनमधला VIDEO समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
भोंदूबाबा अशोक खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागली आहे. नाशिकमधून नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिक : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रोज या प्रकरणी नव नवीन खुलासे होत आहे. पण, या भोंदूबाबा अशोक खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागली आहे. नाशिकमधून नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचं हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या तरुणाने खरात याचे व्हिडीओ बाहेर आणल्याचा संशय आहे. अखेरीस कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव याने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला होता.त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
[video width="738" height="554" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/neeraj-jadhav-2026-03-6ac5426d68cc516ac857d99cde06d54f.mp4"][/video]
नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी नीर जााधव याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. १०० हुन अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.
नीरजवर खरातकडे ५ कोटी मागण्याचा आरोप
खरंच तर नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. नीरजचने खरातच्या नकळत ऑफिसमधील 58 सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले. त्यानंतर खरातला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे. नीरजकडून 5 कोटींची मागणी करण्यात आली होती. पण अशोक खरातने नीरजला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पुढे जाऊन पीडितांच्या मदतीनं पुन्हा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला होता. शिर्डीतील महिलेला मॉर्फ फोटो, व्हिडिओ खरातला पाठवले होते. नीरज हा आपल्याला धमकावत असल्याची तक्रारच काही महिलांनी खरातकडे केली होती, अशीही माहिती समोर आली. त्यानंतर खरात याने पीडित महिलांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. नीरजकडून आणखी एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. 'त्या' महिलेचा व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवला असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर नाशिकमधील पीडितेनं पोलिसांकडे तक्रार केली होती.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 5:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात, स्टेशनमधला VIDEO समोर










