'साखरपुडा मोडला, लग्नानंतरही माझ्यावर अत्याचार', सात वर्षानंतर पीडितेने मौन सोडलं, नाशिकची 'कॅप्टन फाईल्स'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातने एका महिलेला फसवून तिच्यावर कसा अत्याचार केला, याची धक्कादायक कहाणी समोर आली आहे.
मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्यासंदर्भाने नवनवी माहिती समोर येत आहे. पीडित महिलेशी ओळख ते अनेक वर्षे अत्याचार अशी कॅप्टन खरातची क्रूर कहाणी समोर आली आहे. विशेष पोलीस पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात पोलीस कॅप्टन फाईल्सचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान पीडितेने आपल्यावर ओढावलेली आपबीती तक्रारीतून पोलिसांना सांगितली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालु्क्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसह सगळ्याच क्षेत्रातील दिग्गजांची उठबस होती. याच माध्यमातून त्याने करोडो रुपयांची माया जमवली. श्रीमंत महिलांना गाठून, त्यांच्याशी सलगी निर्माण करून, त्यांना विश्वास संपादन करून कॅप्टन अशोक खरात त्यांचे शोषण करीत असे. तसेच महिलांकडून तो वारंवार पैसेही उकळत असल्याची माहिती आहे. कॅप्टन खरातने एका पीडितेला फसवून कसा अत्याचार केला, याची कहाणी समोर आली आहे.
advertisement
साखरपुडा मोडला, लग्नानंतरही माझ्यावर अत्याचार, सात वर्षानंतर पीडितेने मौन सोडलं
२०१९ साली कॅनडा कॉर्नर येथे पीडितेशी अशोक खरात याची ओळख झाली. माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून अशोक खरात याने महिलेचा विश्वास संपादन केला. महिलांच्या दैनंदिन आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अशोक खरात विविध विधी करीत असे. अशोक खरात याच्याशी ओळख झाल्यानंतर आणि चांगली मैत्री झाल्यानंतर २०२१ मध्ये पीडितेचा साखरपुडा मोडला. महिलेकडून ५० हजार उकळत तिला पुष्कराज खडा दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये खरातने पीडितेला कार्यालयात बोलावलं. प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी दिल्याने तिला गुंगी आली. भीती दाखवत कॅप्टन खरातने महिलेवर अत्याचार केला.
advertisement
पीडितेचे लग्न झाल्यानंतर कॅप्टन खरातने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. मी कृष्णाचा अवतार आहे. तू माझी मागच्या जन्मीची राधा आहेस, अशी बतावणी कॅप्टन खरातने पीडितेला केली. तू माझी प्रेयसी न झाल्यास तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, अशी भीतीही त्याने महिलेला घातली. त्यानंतर मात्र पीडितेने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला.
advertisement
महिलांवर अत्याचार कसा करायचा? कॅप्टनची मोडस ऑपरेंडी समोर
मी कृष्णाचा अवतार आहे. तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट -खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांना अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्त्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा.
advertisement
महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कधीकधी संमतीने तर कधी जबरदस्तीने तो महिलांवर अत्याचार करीत असे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्याची काळी कृत्ये सुरू असल्याची माहिती आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'साखरपुडा मोडला, लग्नानंतरही माझ्यावर अत्याचार', सात वर्षानंतर पीडितेने मौन सोडलं, नाशिकची 'कॅप्टन फाईल्स'









