Baba Vanga Prediction 2026 : सोनं स्वस्त होणार की विकून टाकण्याची वेळ येणार? बाबा वेंगाच्या भाकितानं उडाली गुंतवणूकदारांची झोप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक तणावामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, आता अचानक झालेल्या प्राईस क्रॅशने (Price Crash) गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे की आपली गुंतवणूक विकून नफा कमावण्याची वेळ? हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज आहेत.
भारतीय कुटुंबात सोन्याला केवळ एक धातू म्हणून नाही, त्याकडे गुंतवणूक आणि लक्ष्मी म्हणून पाहिलं जातं, शिवाय हे स्टेटस सिंबॉल देखील आहे. लग्नकार्य असो किंवा अक्षय्य तृतीयेसारखा मुहूर्त, सोनं खरेदी करणं ही आपली परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दुकानात जाण्यापूर्वी सामान्य माणूस दहावेळा विचार करत आहे. काही आठवड्यांपूर्वी सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि आता किमतीत अनपेक्षित चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
advertisement
युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक तणावामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, आता अचानक झालेल्या प्राईस क्रॅशने (Price Crash) गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे की आपली गुंतवणूक विकून नफा कमावण्याची वेळ? हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज आहेत.
advertisement
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा आणि धातू बाजारावर झाला आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची ठिणगी पडते, तेव्हा शेअर बाजार कोसळतो आणि लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. याच कारणामुळे भारतात सोन्याचा दर सध्या प्रति 10 ग्रॅम 1.50 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी ज्यांना दागिन्यांची खरेदी करायची आहे, त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.
advertisement
बाबा वेंगा यांचे 2026 बद्दलचे धडकी भरवणारे भाकीतसोन्याच्या या अनिश्चित काळात आता बुल्गेरियाचा प्रसिद्ध 'बाबा वेंगा' यांच्या 2026 च्या भाकिताची चर्चा जगभर रंगली आहे. ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये मोठ्या जागतिक आर्थिक संकटाचा इशारा दिला होता. या संकटामुळे बँका डबघाईला येऊ शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. जेव्हा बँका आणि कागदी चलनावरचा विश्वास उडतो, तेव्हा सोन्याचे महत्त्व अधिक वाढते.
advertisement
advertisement
तज्ज्ञ काय म्हणतात? सावधगिरी बाळगासोन्याचे भाव हे केवळ अफवांवर नाही, तर जागतिक व्याजदर, महागाई आणि राजकारणावर अवलंबून असतात. आर्थिक विश्लेषकांच्या मते युद्धाची परिस्थिती निवळली की सोन्याचे भाव पुन्हा खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियावरील हायपे पाहून किंवा भीतीपोटी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा. सोने ही नेहमीच एक खात्रीशीर गुंतवणूक राहिली आहे, त्यामुळे आपल्या आर्थिक नियोजनानुसारच पावले उचला.
advertisement








