13 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली राकेश बापटची Ex बायको? The 50 मधला VIDEO समोर, दोघे बाथरूममध्ये...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
राकेश बापटची एक्स बायको रिद्धी डोगरा the 50 शोमध्ये खेळतेय. तिथे ती पुन्हा प्रेमात पडल्याचं दिसतंय. तिचा बाथरूममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहेत. घरात त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. राकेशने त्याच्या डिवोर्सबद्दलही सांगितलं. राकेशचं लग्न अभिनेत्री रिद्धी डोगरबरोबर झालं होतं. पण लग्नाच्या 8 वर्षांनी दोघांचा डिवोर्स झाला. डिवोर्सनंतर दोघांनीही लग्न केलेलं नाही. त्यांचे रिलेशन्स झाले पण ते मुव्ह ऑन करू शकले नाहीत असंही राकेशनं सांगितलं.
दरम्यान राकेशची एक्स बायको रिद्धी डोगरा the 50 शोमध्ये खेळतेय. तिथे ती पुन्हा प्रेमात पडल्याचं दिसतंय. तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याच्या ती प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
दोघे एकमेकांशी बोलण्यासाठी थेट The 50 च्या बाथरूममध्ये गेले होते. रिद्धीने बाथरूममध्ये तिच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या. या शोमधील स्पर्धक अभिनेत्री रिद्धी डोगरा आणि सिवेत तोमर यांच्या वाढत्या जवळकीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दोघांमधील केमिस्ट्री, फ्लर्टिंग आणि इमोशनल बोलणं यामुळे सोशल मीडियावरही या जोडीची चर्चा रंगली आहे.
शोदरम्यान सिवेत तोमर अनेकदा रिद्धीसोबत फ्लर्ट करताना दिसला आहे. इतकंच नाही तर त्यानं कॅमेऱ्यासमोर रिद्धीला प्रपोजही केलं होतं. दुसरीकडे रिद्धी देखील सिवेतबाबत प्रोटेक्टिव्ह असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.
advertisement
advertisement
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सिवेतचा थोडा बदललेला स्वभाव दिसून येतो. तो रिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. सिवेतचं हे वागणं पाहून रिद्धी अस्वस्थ झाली अखेर ती त्याला बाथरूममध्ये घेऊन जाऊन थेट त्याच्याशी बोलताना दिसतेय. या वेळी रिद्धी त्याला विचारते की, "तू काय करत आहेस, मला सांग. मला समजत नाहीये तुला काय झालंय. तू माझ्याशी बोलत का नाहीस? मला वाईट वाटतंय, म्हणून मला जाणून घ्यायचं आहे."
advertisement
रिद्धी त्याला ओव्हरफ्रेंडली म्हटल्याचं त्याला आवडलं नाही त्यामुळेच तो तिच्यापासून दूर राहू लागला, असं त्याने सांगितलं. रिद्धीने लगेचच स्पष्ट केले की ती फक्त मजेत बोलली होती आणि त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता.
हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या दोघांना ट्रोलही केले आहे. बाथरूममध्ये जाऊन बोलण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिवेत तोमर हा रिद्धीपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. तो रियलिटी शो स्टार, मॉडेल आणि अभिनेता असून, MTV Roadies आणि Splitsvilla सारख्या शोमधून पुढे आला आहे.
advertisement
या सगळ्या घडामोडींमुळे रिद्धी आणि सिवेत यांचं नातं नेमकं काय आहे? त्यांच्या नात्याबद्दल आणखी कोणते ट्विस्ट समोर येतात हे पाहणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 8:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
13 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली राकेश बापटची Ex बायको? The 50 मधला VIDEO समोर, दोघे बाथरूममध्ये...










