गॅस आणि पेट्रोल-डिझेल तर फक्त ट्रेलर; इराण-अमेरिका युद्धाचा सिनेमा अजून बाकीच; भारतीय आता या संकटांसाठी तयार रहा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण मित्रांनो, हे संकट केवळ गॅस आणि पेट्रोलपुरते मर्यादित नाही. इराण-अमेरिका युद्धाचा हा भडका आता तुमच्या मोबाईलमधील चिपपासून ते शेतातल्या खतांपर्यंत प्रत्येक गोष्टीला आपल्या विळख्यात घेणार आहे. या युद्धामुळे आणखी कोणकोणत्या गोष्टींवर भारताला फटका बसणार आहे? चला पाहूया...
'ये तो सिर्फ शुरुवात है, Picture अभी बाकी है मेरे दोस्त....' हा डायलॉग तुम्ही अनेकदा सिनेमांमध्ये ऐकला असणार. पण इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे अशीच परिस्थीती खऱ्याखुऱ्या आयुष्यात ओढावली आहे. युद्ध भडकल्यानंतर त्याचे पडसाद आता गल्लीबोळातील हॉटेल आणि टपऱ्यांपर्यंत दिसू लागले आहेत. सर्वात आधी एलपीजी महागल्याच्या बातम्या आल्या आणि कमर्शियल सिलिंडरचे दर गगनाला भिडले. याचा परिणाम इतका भीषण झाला की, खर्च परवडत नसल्याने अनेक छोट्या हॉटेल्सना कुलूप लागले, तर काहींनी चक्क चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी आपले स्टॉल्स सुरू ठेवले, त्यांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेल महागल्याची बातमी समोर आली आणि सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले.
advertisement
advertisement
1. शेती आणि अन्नाचे भाव (खतांची टंचाई)भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हे युद्ध सर्वात मोठे संकट ठरू शकते.खतांचा तुटवडा: आखाती देशांतून 'युरिया' बनवण्यासाठी लागणारा नैसर्गिक वायू आणि सल्फर, अमोनिया यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात येतात. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने हा पुरवठा विस्कळीत झाला आहे.परिणाम: खतांच्या किमती गेल्या दोन आठवड्यात 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर खत महागले, तर शेतीचा खर्च वाढेल आणि पर्यायाने गहू, तांदूळ आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडतील. म्हणजे युद्धाची झळ थेट तुमच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे.
advertisement
2. मोबाईल, लॅपटॉप आणि एआय (हेलियम संकट)तुम्हाला वाटेल युद्धाचा आणि तुमच्या मोबाईलचा काय संबंध? पण याचे उत्तर आहे हेलियम.का महत्त्वाचे? जगातील एकूण हेलियम पुरवठ्यापैकी एक तृतीयांश हिस्सा एकटा 'कतार' पुरवतो. मोबाईल आणि कॉम्प्युटरमधील चिप्स (Semiconductors) बनवण्यासाठी हेलियम अनिवार्य आहे.परिणाम: कतारमधील प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे हेलियमचे उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे येत्या काळात नवीन मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी 'चॅटजीपीटी' (ChatGPT) सारख्या एआय सिस्टिम्स चालवणारे सर्व्हर महाग होऊ शकतात.
advertisement
3. औषध निर्मितीभारत हा जगाचा 'फार्मसी' मानला जातो, पण आपली अनेक औषधे बनवण्यासाठी लागणारी रसायने आणि कच्चा माल मध्य-पूर्वेतून येतो. हॉर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे मालवाहू जहाजांना आता आफ्रिकेला वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढले आहेत.परिणाम: ताप, खोकला यांसारख्या सामान्य आजारांपासून ते गंभीर आजारांच्या औषधांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
advertisement
4. प्लास्टिक आणि ऑटोमोबाईल उद्योगआपण वापरत असलेल्या बादलीपासून ते कारच्या टायरपर्यंत सर्वच गोष्टींसाठी 'पॉलिमर्स' आणि 'पेट्रोकेमिकल्स' लागतात.पॉलिमरची दरवाढ: गेल्या दोन आठवड्यात प्लास्टिक बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.परिणाम: प्लास्टिक पॅकेजिंग महागल्यामुळे दुधाच्या पिशव्यांपासून ते पाण्याच्या बाटल्यांपर्यंत सर्वच वस्तू महाग होतील. सुटे भाग महागल्याने नवीन गाड्यांच्या किमतीही वाढणार आहेत.
advertisement
5. ॲल्युमिनियम आणि बांधकाम क्षेत्रमध्य-पूर्वेतील देश हे ॲल्युमिनियमचे मोठे उत्पादक आहेत. ॲल्युमिनियम बनवण्यासाठी प्रचंड वीज लागते, जी नैसर्गिक वायूपासून मिळते. गॅस महागल्यामुळे ॲल्युमिनियमचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले आहेत.परिणाम: घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि स्वयंपाकातील भांडी बनवण्यासाठी लागणारा खर्च वाढणार असल्याने बांधकाम क्षेत्राला मंदीचा फटका बसू शकतो.
advertisement








