193 नॉटआऊट अन् 35 बाऊंड्री... 22 वर्षांच्या भारतीयाने इतिहास घडवला, T20 मध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
22 वर्षांच्या आर्य देसाईने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला आहे. आर्यने टी-20 सामन्यामध्ये नाबाद 193 रनची खेळी आहे. या विक्रमी शतकामध्ये आर्यने 21 फोर आणि 14 सिक्स मारल्या.
मुंबई : 22 वर्षांच्या आर्य देसाईने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला आहे. आर्यने टी-20 सामन्यामध्ये नाबाद 193 रनची खेळी आहे. या विक्रमी शतकामध्ये आर्यने 21 फोर आणि 14 सिक्स मारल्या. लुथरा पेगाससकडून खेळणाऱ्या आर्य देसाईने कैलाश स्पोर्ट्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 193 रन केले, पण त्याचं द्विशतक फक्त 7 रननी हुकलं.
मान्यताप्राप्त टी-20 स्पर्धेमध्ये आर्य देसाई जगात सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू बनला आहे. आर्यच्या या ऐतिहासिक खेळीमुळे लुथरा पेगाससने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 267 रनचा मोठा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या कैलाश स्पोर्ट्स क्लबने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 179 रन केल्या, त्यामुळे लुथरा पेगाससचा 93 रननी विजय झाला. सुरत क्रिकेट लीगच्या सामन्यात आर्य देसाईने हा विश्वविक्रम केला आहे.
advertisement
कोण आहे आर्य देसाई?
आर्य देसाई हा गुजरातकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. गुजरातकडून आर्यने आतापर्यंत 20 प्रथम श्रेणी आणि 17 लिस्ट ए सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आर्यने 1083 रन केले आहेत, ज्यात 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए मध्ये आर्यने 5 अर्धशतकं आणि एका शतकाच्या मदतीने 623 रन केल्या आहेत.
advertisement
आर्य देसाई आयपीएलमध्ये केकेआरच्या टीममध्ये होता, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. तसंच तो सातत्याने नॅशनल क्रिकेट अकादमीच्या कॅम्पमध्येही असतो. टी-20 फॉरमॅटमध्ये 193 रनच्या या ऐतिहासिक खेळीनंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याचं कौतुक केलं आहे. आर्य देसाई याच्यावर लवकरच एखाद्या फ्रॅन्चायजीची नजर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Surat,Surat,Gujarat
First Published :
Mar 20, 2026 11:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
193 नॉटआऊट अन् 35 बाऊंड्री... 22 वर्षांच्या भारतीयाने इतिहास घडवला, T20 मध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड!










