advertisement

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांची स्पीडबोट समुद्रात पलटली, एअरलिफ्ट केले, मुंबईत उपचार सुरू;अपघातात 2 जण बेपत्ता

Last Updated:

Gautam Singhania Accident: रेमंड ग्रुपचे एमडी गौतम सिंघानिया मालदीवमध्ये बोट अपघातात जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले आहे.

News18
News18
मुंबई: रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया मालदीवमध्ये झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. मालदीवमधील फेलिधूजवळ गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजता त्यांची स्पीडबोट समुद्रात पलटली. या अपघातात सिंघानिया जखमी झाले असून त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताच्या वेळी बोटीत सिंघानिया यांच्यासह आणखी 6 जण होते. त्यापैकी एक भारतीय नागरिकासह दोन जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. रेमंड ग्रुपचा व्यवसाय कपडे, डेनिम, कन्झ्युमर केअर, इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
advertisement
तयार कपड्यांच्या बाजारात रेमंडची अव्वल स्थानी आहे. तसेच डेनिम क्षेत्रातही ही कंपनी अग्रगण्य उत्पादकांपैकी एक असून उच्च दर्जाचे डेनिम उत्पादनासाठी ती ओळखली जाते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांची स्पीडबोट समुद्रात पलटली, एअरलिफ्ट केले, मुंबईत उपचार सुरू;अपघातात 2 जण बेपत्ता
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement