advertisement

बायको आणि मित्राला नकोत्या अवस्थेत पाहिलं, रागावलेल्या नवऱ्यानं आधी दिला चोप मग.... घटना देशभर ठरली चर्चेचा विषय

Last Updated:

प्रेमाचं एक असे अजब प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाची आठवण येईल. मात्र, या खऱ्या आयुष्यातील कथेत मारहाण, हॉस्पिटल आणि शेवटी एका मंदिरातील लग्नाचा असा थरार रंगला, ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभर होत आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
पटना : मैत्री आणि प्रेम या दोन भावना मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा आपण मित्रावर जास्त विश्वास ठेवतो. पण जर याच विश्वासाला तडा गेला आणि आपला सर्वात जवळचा मित्रच आपल्या संसारात 'तिसरा' बनून आला तर? बिहारच्या सासाराममधून प्रेमाचं एक असे अजब प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाची आठवण येईल. मात्र, या खऱ्या आयुष्यातील कथेत मारहाण, हॉस्पिटल आणि शेवटी एका मंदिरातील लग्नाचा असा थरार रंगला, ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभर होत आहे.
दिल्लीतील मैत्री आणि फुललेलं प्रेम
या कथेची सुरुवात होते धर्मेंद्र राम आणि लव कुमार या दोन मित्रांपासून. धर्मेंद्रचं लग्न 2021 मध्ये मंजू कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहत धर्मेंद्र आपल्या पत्नीला घेऊन दिल्लीला गेला. तिथेच त्याचा मित्र लव कुमार उर्फ अजय राम याचेही येणे-जाणे होते. मित्रावर विश्वास ठेवून धर्मेंद्रने त्याला आपल्या घरात स्थान दिले, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
advertisement
धर्मेंद्रच्या घरात वावरताना लव आणि मंजू यांच्यात जवळीक वाढली. पाच वर्षांच्या मुलाची आई असलेल्या मंजूने आपल्या पतीच्या मित्रालाच आपले हृदय दिले. दोघांनीही एकमेकांशिवाय जगता येणार नाही, असा निर्धार केला. जेव्हा धर्मेंद्रला या अफेअरची कुणकुण लागली, तेव्हा त्याने परिस्थिती सावरण्यासाठी पत्नीला घेऊन गाव गाठले. पण हे प्रकरण मिटले नाही तर त्याने वेगळंच वळण घेतलं.
advertisement
धर्मेंद्र कामासाठी गुजरातला गेल्याचा फायदा घेत मंजूने सासरच्या घराला कुलूप लावले आणि ती माहेरी (भानस गाव) निघून गेली. इकडे लव कुमारलाही मंजूशिवाय राहवेना. तो तिला भेटण्यासाठी थेट तिच्या माहेरी पोहोचला. मात्र, ही माहिती धर्मेंद्र आणि मंजूच्या भावाला मिळाली. संतापलेल्या पतीने आपल्या मेव्हण्याला घेऊन सोबत घेऊन भानस गाव गाठले आणि तिथे जे घडले ते पाहून गावकरीही हादरले.
advertisement
आपल्या बायकोला मित्रासोबत एका खोलीत पाहून धर्मेंद्रचा संयम सुटला. त्याने आणि त्याच्या मेव्हण्याने मिळून मंजू आणि लव या दोघांचीही 'भर चौकात' धुलाई केली. मारहाण इतकी भीषण होती की दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, उपचार घेऊन बाहेर आल्यावरही मंजू आणि लव एकमेकांपासून वेगळे व्हायला तयार नव्हते. त्यांनी 'जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ' अशीच मागणी केली.
advertisement
सरपंच आणि गावकऱ्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मंजूने पतीकडे परतण्यास नकार दिला. शेवटी, धर्मेंद्रने अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्याने आपल्या बायकोचे लग्न तिच्या प्रियकराशी (जो त्याचा मित्र होता) लावून देण्याचे मान्य केले.
हनुमान मंदिरात झाला मिलन सोहळा
दिनारा येथील हनुमान मंदिरात देवाच्या साक्षीने मंजू आणि लव यांचा विवाह पार पडला. ज्या पतीने काही वेळापूर्वी रागाच्या भरात मारहाण केली होती, त्याच पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि नवीन संसाराची सुरुवात केली. या अजब लग्नाचे साक्षीदार मंजूचे आई-वडील आणि स्थानिक गावकरी झाले.
advertisement
आजच्या काळात नात्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे. सासाराममधील ही घटना प्रेम, राग आणि त्यागाचा एक विचित्र संगम आहे. एका पतीने दाखवलेला हा मोठेपणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
बायको आणि मित्राला नकोत्या अवस्थेत पाहिलं, रागावलेल्या नवऱ्यानं आधी दिला चोप मग.... घटना देशभर ठरली चर्चेचा विषय
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement