Coughing : सर्दी - खोकल्यानं हैराण ? घरगुती उपाय करतील तुमचं रक्षण, बदलत्या ऋतूत घ्या प्रकृतीची काळजी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बदलत्या हवामानामुळे खोकला, सर्दी आणि घसादुखी यांसारख्या समस्या वाढतात. हवामानातील चढ-उतारांदरम्यान, शरीराला नवीन तापमानाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आणि या काळात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेकांना अचानक खोकला सुरू होतो. खोकला बरा करण्यासाठी नेहमीच औषधांची गरज नसते. काही घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो.
मुंबई : काही भागात ऊन, काही भागात पाऊस, काही भागात गारपीट असं चित्र सध्या राज्याच्या काही भागात आहे. दिवसाच्या सुरुवातीला ऊन, नंतर गारवा अशा हवामानातल्या बदलांचा काहींना त्रास होऊ शकतो.
बदलत्या हवामानामुळे खोकला, सर्दी आणि घसादुखी यांसारख्या समस्या वाढतात. हवामानातील चढ-उतारांदरम्यान, शरीराला नवीन तापमानाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आणि या काळात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेकांना अचानक खोकला सुरू होतो. खोकला बरा करण्यासाठी नेहमीच औषधांची गरज नसते. काही घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो.
advertisement
खोकल्याची प्रमुख कारणं - विषाणू किंवा जिवाणू संसर्ग, ऍलर्जी आणि दमा, ऍसिड रिफ्लक्स,कमकुवत प्रतिकारशक्ती, धूम्रपान आणि प्रदूषण, दीर्घकालीन आजार
खोकल्याचे प्रकार - कोरडा खोकला, कफयुक्त खोकला, ऍलर्जीजन्य खोकला
खोकल्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करुन पाहा.
मध आणि आलं: मधामुळे घशातील खाज कमी होते आणि आल्यामधे दाहशामक गुणधर्म असतात. अर्धा चमचा आल्याचा रस एका चमचा मधात मिसळून दिवसातून किमान दोन ते तीन वेळा प्या.
advertisement
हळदीचं दूध: हळदीत जंतुनाशक आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यानं खोकला, संसर्गापासून रक्षण होतं.
advertisement
तुळस आणि काळी मिरी काढा: तुळस घसा साफ करण्यासाठी आणि कफ पातळ करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर, काळी मिरीमुळे सूज कमी होते आणि सर्दीचा प्रभाव कमी करते. तुळशीची पाच ते सहा पानं पाण्यात उकळा, त्यात चिमूटभर काळी मिरी घाला आणि प्या. हा काढा खोकला, घसादुखी आणि सर्दीपासून त्वरित आराम देतो.
advertisement
वाफ घेणं: वाफ घेतल्यानं घशातील कफ पातळ होतो आणि श्वास घेणं सोपं होतं. पाच ते सात मिनिटं वाफ घ्या. डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेतल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढेल. यासाठी स्टिमरचाही वापर करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 11:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coughing : सर्दी - खोकल्यानं हैराण ? घरगुती उपाय करतील तुमचं रक्षण, बदलत्या ऋतूत घ्या प्रकृतीची काळजी