पंढरीत भाविकांच्या हस्ते पूजा, टोकन दर्शन बंद, चैत्री यात्रेआधी मोठा निर्णय, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर: आषाढी, कार्तिकी प्रमाणेच चैत्र यात्रेसाठी देखील पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात. भाविकांच्या याच मांदियाळीमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात्रा काळात भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व टोकन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक झाली. यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार यात्रा काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
दर्शन रांगेतील भाविकांसाठी सुविधा
चैत्र यात्रा काळात मंदिर समितीशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन दर्शन रांगेतील भाविकांसाठी थंड पाणी, लिंबू-सरबत, पंखे व कुलर, तसेच आरोग्य सेवा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक मासात विशेष सुविधा
यंदा 17 मे ते 15 जून दरम्यान अधिक मास येत आहे. या काळात पंढरपुरात मोठ्या संख्येने भाविक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती औसेकर यांनी दिली.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पंढरीत भाविकांच्या हस्ते पूजा, टोकन दर्शन बंद, चैत्री यात्रेआधी मोठा निर्णय, कारण काय?









