advertisement

इराण युद्धात ज्याची भीती तेच घडलं, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबई-पुण्यात काय आहेत दर?

Last Updated:

एकीकडे इराण युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे भारतात सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडलं आहे. लाँग विकेण्ड म्हणून फिरायला बाहेर पडताय पण गाडीत पेट्रोल डिझेल भरण्याआधी एकदा हे दर पाहा, कारण तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

News18
News18
अवकाळी पावसानं नुकसान झालं, गॅसचे दर वाढले आणि आता पुन्हा एकदा इंधनाच्या किमतींनी डोकं वर काढलं आहे. ७ मार्चला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची मोठी वाढ केल्यानंतर, आता तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. जरी सामान्य पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर दिसत असले, तरी ही दरवाढ भविष्यात महागाईचा मोठा भडका उडवण्याचे संकेत देत आहे.
22 रुपयांनी महाग झालं डिझेल?
सर्वसामान्यांना वाटू शकतं की आपल्या गाडीचं डिझेल महागलं नाही, पण खरा धोका तिथेच आहे. उद्योगांसाठी आणि मोठ्या ट्रान्सपोर्टसाठी वापरलं जाणारं बल्क डिझेल एका फटक्यात २२ रुपयांनी महागलं आहे. जेव्हा मालवाहतूक महागते, तेव्हा त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतो. म्हणजेच, ही दरवाढ फिरून पुन्हा सामान्य माणसाच्याच खिशाला कात्री लावणार आहे.
advertisement
प्रीमियम पेट्रोलचेही दर वाढले
ज्यांच्याकडे नवीन मॉडेलच्या गाड्या आहेत आणि जे XP95 सारखं प्रीमियम पेट्रोल वापरतात, त्यांना आता प्रति लिटर २ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलर्सच्या पार गेल्याचं कारण देत कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांवर टाकायला सुरुवात केली आहे. ही दरवाढ 20 मार्चपासून सर्वत्र लागू करण्यात आली आहे. दिलासाच्या एकच गोष्ट म्हणजे तूर्तास नॉर्मल पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
advertisement
नॉर्मल पेट्रोल डिझेलचे दर काय?
मे २०२२ पासून केंद्र सरकारने अबकारी करात कपात केल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारा चढ-उतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे तेल कंपन्यांवर दरांचा दबाव कायम असतो. सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार का, अशी चिंता सर्वसामान्यांना सतावते आहे.
advertisement
शहरपेट्रोल लिटरडिझेल प्रति लिटर
मुंबई१०४.२१९२.१५
पुणे१०४.०४९०.५७
नाशिक९५.५०८९.५०
नवी दिल्ली९४.७२८७.६२
नागपूर१०३.७५९०.२०
बेंगळुरू१०२.९२८९.०२
इंधनाचे दर कसे ठरतात?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा बॅरल महागला की त्याचा परिणाम थेट आपल्या पंपावर होतो. इंधन डॉलरमध्ये विकत घेतलं जातं, त्यामुळे रुपया कमजोर झाला की इंधन महाग होतं. पेट्रोलच्या किमतीत केंद्र आणि राज्य सरकारचे विविध कर यांचा मोठा वाटा असतो.
advertisement
घरबसल्या एका SMS वर दर तपासा
जर तुम्हाला दररोजच्या किमती जाणून घ्यायच्या असतील, तर आता पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एक मेसेज करून दर पाहू शकता
Indian Oil: 'RSP <तुमच्या शहराचा कोड>' टाइप करून ९२२४९९२२४९ वर पाठवा.
BPCL: 'RSP' लिहून ९२२३११२२२२ वर पाठवा.
HPCL: 'HP Price' लिहून ९२२२२०११२२ वर पाठवा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
इराण युद्धात ज्याची भीती तेच घडलं, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबई-पुण्यात काय आहेत दर?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement