Sikandar Shaikh : पुण्याच्या पैलवानाचा एक फटका आणि सिकंदर जखमी, शेवटच्या एक मिनिटात वाघासारखा लढला, Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sikandar Shaikh vs Manish Rayate Kusti Maharastra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तिसऱ्या राऊंडमध्ये पुणे शहरातील पैलवान मनीष रायते आणि हिंगोलीचा पैलवान सिकंदर शेख यांच्यात कुस्ती लावली गेली. यात सिकंदर शेखने बाजी मारली आहे.
Sikandar Shaikh vs Manish Rayate : पुण्यातील वाघोली इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची (Maharastra Kesari 2026) उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राचा स्टार पैलवान सिकंदर शेख याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला अन् पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिकंदर शेख याने पुम्याचा पैलवान मनीश रायते याचा (Sikandar Shaikh vs Manish Rayate Kusti) पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात सिकंदरने अखेरपर्यंत डाव टाकला अन् कुस्ती 2-8 ने सुटली. या लढतीत सिकंदरने जोर लावत आपले नवे डावपेच समोर आणले.
मनिषचा हात सिकंदरच्या नाकाला लागला अन्...
पुण्याचा पैलवान मनिष याने सुरूवातीलाच सिकंदर शेखवर जोर लावला आणि पहिल्या दोन मिनिटातच दोन पाईंट्स घेतले. सिकंदर यावेळी बॅकफूटला आला. सिकंदरने बचावात्मक कुस्ती पहिल्या हाफमध्ये खेळली. त्यानंतर त्याने आपली चपळ कुस्तीचे डाव काढले. मनिषला वॉर्निंग बेल मिळाल्यानंतर त्याला 30 सेकंदात पाईंट्स घेता आले नाहीत. त्याचवेळी सिकंदर शेखने स्टेपआऊटचं चॅलेन्ज रिजेक्ट झाल्यानं एक पाईंट मिळाला. त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवला अन् सिकंदरच्या खात्यात चार पाईंट आले. त्यावेळी मनिषचा हात सिकंदरच्या नाकाला लागला अन् नाकातून रक्त वाहू लागलं. पंचांनी पुण्याच्या पैलवानाला वॉर्निंग दिली अन् सिकंदरने पुन्हा लढत दिली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 7:47 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikandar Shaikh : पुण्याच्या पैलवानाचा एक फटका आणि सिकंदर जखमी, शेवटच्या एक मिनिटात वाघासारखा लढला, Video







