Sikandar Shaikh : नाद करतो काय! पुण्याच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 'पहिला उलटफेर' पण सिकंदरचा जलवा कायम, Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sikandar Shaikh Kusti Maharashtra kesari 2026 : महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख यांनी विजयी सुरूवात केली आहे. त्यामुळे फायनलची उत्सुकता वाढलीये.
Sikandar Shaikh Kusti Video : पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. माती आणि गादी या दोन्ही विभागांत अतितटीचे सामने झाले असून स्पर्धेचा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच ज्ञानेश्वर जमदाडेला बाळू बोडकेने पराभूत करत पहिला उलटफेर केला आहे. अशातच आता प्रमुख दावेदार असलेल्या सिंकदर शेखने देखील विजयी सलामी देत तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय.
गुरुवारी धक्कादायक निकाल, ज्ञानेश्वर जमदाडेचा पराभव
पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गुरुवारी एक धक्कादायक निकाल लागला. प्रसिद्ध मल्ल ज्ञानेश्वर जमदाडे याला बाळू बोडके या पैलवानने हरवलं, त्यामुळे कुस्तीच्या वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीये. महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख यांनी विजयी सुरूवात केली असून फायनल कुणामध्ये होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. अशातच तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सिकंदर शेखने पुणे जिल्ह्याच्या अनिकेत मांगडेचा 8-1 ने एकतर्फी पराभव केलाय.
advertisement
advertisement
सिकंदर शेखचा जलवा कायम
नाशिकच्या बाळू बोडकेने कोल्हापूरच्या माऊली जमदाडेवर 10-5 गुणांनी सनसनाटी विजय मिळवला. तर याच विभागात खेळताना सिकंदरने सावध सुरूवात केली. अनिकेतचा डाव समजून घेतला. अनिकेतने पहिला पहिल्या काही मिनिटातच पाईंट घेतला. त्यानंतर सिकंदरने आपला जलवा दाखवला. एकामागून एक डाव टाकत सिकंदरने बाजी मारली अन् कुस्ती 8-1 ने एकतर्फी सोडवली. त्यानंतर आता सिकंदर तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह नव्या उंचीवर पोहोचलाय.
advertisement
सिकंदरच्या संपूर्ण कुस्तीचा video
महेंद्र गायकवाडने विशाल बनकरला हरवलं
दरम्यान, गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने 10 गुण मिळवत विजयी मिळवलाय. तर दुसऱ्या लढतीत प्रसिद्ध मल्ल शिवराज राक्षेने प्रतीक जगतापला हरवलं. प्रतीकने सुरुवातीला 2 गुण मिळवले असले तरी, शिवराजने चपळ डाव टाकत 10 गुणांची कमाई करत विजय मिळवला. तसेच माती विभागात सोलापूरच्या अनुभवी महेंद्र गायकवाडने विशाल बनकरला 6-1 गुणांनी धोबीपछाड दिला. हा सामना देखील रोमांचक झाला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 8:59 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikandar Shaikh : नाद करतो काय! पुण्याच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 'पहिला उलटफेर' पण सिकंदरचा जलवा कायम, Video










