advertisement

Agra accident: देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, बोलेरोनं घात केला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, PHOTO

Last Updated:
कैला देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या माजी सैनिक कामता प्रसाद यांच्या कुटुंबाच्या बोलेरो गाडीला अपघात झाला. पाच जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी. अपघात राजस्थानातील करौली परिसरात घडला.
1/7
भक्तीभावाने देवीच्या दर्शनाला गेलेलं कुटुंब सुखरूप घरी परतेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कैला देवीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बोलेरो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.

2/7
ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचा चेंदामेंदा झाला आणि गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढलं.

3/7
मिळालेल्या माहितीनुसार, इटावा येथील इकदिल भागातील माजी सैनिक कामता प्रसाद हे आपल्या कुटुंबासह दोन गाड्यांमधून देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन गुरुवारी उशिरा रात्री ते परतत असताना, चित्राहाट पोलीस ठाण्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हा भीषण अपघात घडला.

4/7
रात्रीची वेळ असल्याने चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातूनच गाडीवरील नियंत्रण सुटून ती झाडावर आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या हृदयद्रावक अपघातात माजी सैनिक कामता प्रसाद, त्यांचा धाकटा मुलगा देवेंद्र, सून सीमा, ३ वर्षांची चिमुरडी अराध्या आणि नातू ऋषी यांचा मृत्यू झाला आहे.

5/7
एकाच घरातील इतकी माणसं गेल्याने माकोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आदित्य, रोशनी आणि ऋषभ हे तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

6/7
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाडीचा पत्रा चेपला गेल्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर गावकऱ्यांनी गाडीच्या काचा फोडून जखमींना आणि मृतांना बाहेर काढले.

7/7
ही धक्कादायक घटना राजस्थानातील करौली परिसरात घडली आहे. कुटुंबीय करौलीहून उत्तर प्रदेशाला घराकडे निघाले असताना हा अपघात झाला. आग्रा मार्गावर झालेल्या या भीषण अपघात पाहून ग्रामस्थांचाही थरकाप उडाला. अपघाताचे नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement