पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार इतिहासजमा! 261 कोटींच्या 'या' 4 मिसिंग लिंकमुळे बदलणार चित्र
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणची डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तब्बल २६१ कोटी रुपये खर्चून चार महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक' विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणची डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. चाकण परिसरातील वाहनांची कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंबर कसली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तब्बल २६१ कोटी रुपये खर्चून चार महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक' विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुठे होणार हे ४ नवे मार्ग?
चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण आणि आळंदी फाटा या चौकांतील गर्दी कमी करण्यासाठी हे पर्यायी रस्ते गेमचेंजर ठरणार आहेत
हिंगणे चौक ते फोक्सवॅगन कंपनी (खराबवाडी): ९०० मीटर लांबीचा हा रस्ता एमआयडीसी टप्पा ३ ला जोडेल.
नाणेकरवाडी ते समृद्धी सीएनजी पंप: १.२ किमीचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६० ला थेट जोडणी देईल.
advertisement
मेदनकरवाडी ते रासे फाटा: २.५ किमीचा हा रस्ता तळेगाव-चाकण महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असेल.
वेस्टर्न बायपास: चाकण एमआयडीसी टप्पा ५ ते जुना मुंबई-पुणे महामार्ग यांना जोडणारा ६० मीटर रुंद मार्ग.
प्रवाशांना काय होणार फायदा?
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत किमान दीड ते दोन तास अनेकांना चाकण चौकातील वाहतूक कोंडीत अडकून पडावें लागते. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या चाकण एमआयडीसीतील कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना आता थेट पर्यायी मार्ग मिळतील. यामुळे इंधनाची बचत होईलच, शिवाय अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक वेगळी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही घटणार आहे. भूसंपादनानंतर एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. या चारही लिंकच्या मार्गांवर आरक्षण टाकण्यात आले असून, येथील भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागांमध्ये येणारी सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 7:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार इतिहासजमा! 261 कोटींच्या 'या' 4 मिसिंग लिंकमुळे बदलणार चित्र









