advertisement

Summer Special Food : वाळवणाचा भन्नाट प्रकार, अशी बनवा सांडगी मिरची; तिखट खाणाऱ्यांसाठी वर्षभराची सोय!

Last Updated:

Sandagi mirchi recipe in marathi : सांडगी मिरची तिखट आवडणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. कारण एकदा ही मिरची बनवली तर वर्षभरासाठी जेवणासोबत तोंडी लावण्याच्या पदार्थाची सोय होते.

अशी बनवा सांडगी मिरची..
अशी बनवा सांडगी मिरची..
मुंबई : उन्हाळा सुरु झाला, ऊन चांगलं तापायला लागलं की आपल्याकडे वाळवणाचे तयारी सुरु होते. पापड, सांडया, कुरडया.. हे पदार्थ तर बाणतातच पण त्याचसोबत अनेक प्रकारचे वडे, लोणचे हेही बनतात. आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. सांडगी मिरची, हादेखील वाळवणाचाच एक प्रकार आहे.
सांडगी मिरची तिखट आवडणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. कारण एकदा तुम्ही ही मिरची बनवून ठेवलीत तर वर्षभरासाठी तुमच्या जेवणासोबत तोंडी लावण्याच्या एका पदार्थाची सोय होते. या सांडगी मिरचीची रेसिपी foodyogawithsandhya या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.
सांडगी मिरचीसाठी साहित्य..
- 1 किलो बुटक्या जाड्या मिरच्या
- 300 ग्रॅम मोहरीची डाळ
- 1½ टेबलस्पून हिंग पावडर
advertisement
- 1½ टेबलस्पून हळद
- 3 चमचे मेथी पूड
- 2 टेबलस्पून मीठ
अशी बनवा सांडगी मिरची..
- सर्वात आधी मिरच्या स्वच्छ धुवून, सुती कपड्यावर पसरवा आणि पूर्ण कोरड्या होऊ द्या.
- मिरच्या सुकल्यानंतर त्या आपल्याला कापायच्या आहेत, यासाठी मिरची ज्या बाजूने स्थिर राहते, त्याच्या विरुद्ध बाजूला कट द्या. यामुळे मिरचीमध्ये मसाला भरता येईल आणि वाळवताना तो बाहेर येणार नाही.
advertisement
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीमधल्या बिया काढू शकता. पण तुम्हाला तिखट मिरच्या आवडत असतील तर त्या काढू नका.
- मसाला तयार करण्यासाठी मोहरीची डाळ, हिंग, हळद, मेथी पूड आणि मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या.
- आता तयार मसाला मिरचीत घट्ट दाबून भरा. शक्य तितका जास्त मसाला भरला तर मिरचीला चव छान येते आणि वाळल्यानंतर ती पोकळ होत नाही.
advertisement
- भरलेल्या मिरच्या कडक उन्हात 5 ते 6 दिवस चांगल्या वाळवून घ्या.
- मिरच्या व्यवस्थित वाळल्या की त्या वर्षभर टिकतात. अशाप्रकारे तुमच्या सांडगी मिरच्या तयार आहेत.
- वापरताना त्या गरम तेलात थोड्या भाजून किंवा तळून घ्या.
advertisement
ही सांडगी मिरची तुम्ही वर्षभर जेवणासोबत खाऊ शकता. तसेच ही मिरची दडपे पोहे, दहीभात या पदार्थांना अप्रतिम चव देते. तर यंदा वाळवणात तुम्हीही ही सांडगी मिरची नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Special Food : वाळवणाचा भन्नाट प्रकार, अशी बनवा सांडगी मिरची; तिखट खाणाऱ्यांसाठी वर्षभराची सोय!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement