advertisement

Ashok Kharat Case: २९ डिसेंबरचा फिर्यादी, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी? स्वत: केलेली 'तीं' तक्रार अशोक खरातला नडली

Last Updated:

Ashok Kharat Case: राज्याला हादरवणाऱ्या या प्रकरणात आरोपी असणारा अशोक खरात हाच २९ डिसेंबर रोजीचा तक्रारदार असल्याचे समोर आले आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी असणारा फिर्यादी हा १८ मार्च रोजी आरोपी झाला.

२९ डिसेंबरचा फिर्यादी, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी? स्वत: केलेली 'तीं' तक्रार अशोक खरातलाच नडली
२९ डिसेंबरचा फिर्यादी, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी? स्वत: केलेली 'तीं' तक्रार अशोक खरातलाच नडली
नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८ महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. तर, दुसरीकडे त्याच्या घरावर, फॉर्म हाऊसवर छापे मारून आणखी पुरावे जमा केले जात आहे. राज्याला हादरवणाऱ्या या प्रकरणात आरोपी असणारा अशोक खरात हाच २९ डिसेंबर रोजीचा तक्रारदार असल्याचे समोर आले आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी असणारा फिर्यादी हा १८ मार्च रोजी आरोपी झाला. खंडणीची तक्रार कॅप्टन खरातला नडली असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक हादरवून सोडणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खरातने स्वतःला खंडणीसाठी धमकावलं जात असल्याची तक्रार दिली होती, तोच आता महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात गजाआड झाला आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रकरणाचा तपास आता एसआयटीच्या (SIT) हाती असून, दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
advertisement

तक्रारदाराचा 'गेम' उलटला

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे डिसेंबर महिन्यातच रोवली गेली होती. २९ डिसेंबर २०२५ रोजी कॅप्टन खरातने सिन्नरमधील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, पुण्याचा राजेंद्र जासूद आणि भायखळ्याचा दिनेश परब हे त्याला महिलांचे फोटो पाठवून ५ कोटी रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली, मात्र तपासाची चक्रे फिरताच खरात स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आला.
advertisement

अशी झाली खरातला अटक...

२९ डिसेंबर २०२५ रोजी अशोक खरातने खंडणीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १२ मार्च २०२६ रोजी खरातचा शिपाई नीरज जाधव याच्याविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल झाला. एका युवतीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर १८ मार्च २०२६ रोजी नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली. खरातने ज्या महिलांच्या फोटोंचा उल्लेख खंडणीसाठी केला होता, त्याच महिलांचे शोषण त्याने स्वतः केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
अशोक खरात हा स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असे. ऑफिसचे ठिकाणी बोलावून फिर्यादी यांचा धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला आणि पाणी पिण्यास देऊन महिलांचे शोषण करत असे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले. खरातने केलेल्या लैंगिक शोषणाच्या ५८ व्हिडीओ क्लिप्स असल्याची माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: २९ डिसेंबरचा फिर्यादी, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी? स्वत: केलेली 'तीं' तक्रार अशोक खरातला नडली
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement